Supriya Sule WhatsApp Message Touches Many After Plane Crash
Esakal
महाराष्ट्र बातम्या
Devasted, सुप्रिया सुळेंचं व्हॉटसअप स्टेटस; अनिल देशमुख, धनंजय मुंडे, मुश्रिफांना अश्रू अनावर
Ajit Pawar Death : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर व्हॉटसअप स्टेटस एकाच शब्दात स्टेटस ठेवलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे. बारातमीत सभेसाठी येत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. कमी दृश्यमानतेमुळे धावपट्टी न दिसल्यानं विमान कोसळलं आणि यात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर व्हॉटसअप स्टेटस एकाच शब्दात स्टेटस ठेवलंय. Devasted असं स्टेटस ठेवत सुप्रिया सुळे यांनी उद्ध्वस्त झाल्याची भावना व्यक्त केलीय.

