
Suresh Dhas: ‘‘मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील बाब आहे. त्यांनी तो घ्यावा,’’ अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात दहशत पसरवणाऱ्या वाल्मीक कराडची नवी आगळीक आपण येत्या एक ते दोन दिवसांत ध्वनिफितीद्वारे पुढे आणणार आहोत, असा इशाराही धस यांनी पत्रकारांशी बोलताना केला.