
Inspiring Young Papad Seller Boy : सोशल मीडियावर सध्या पापड विकणाऱ्या एका छोट्या मुलाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये गरिबीमुळं हा मुलगा तळलेलं पापड विकतो आहे. त्याच्या या कष्टामुळं भावनिक झालेल्या एका व्यक्तीनं त्याला एका पापडाच्या बदल्यात ५०० रुपये देऊ केले.
यावर त्या मुलानं जे काही उत्तर दिलं, त्यामुळं पैसे ऑफर करणाऱ्या व्यक्तीलाही गलबलून आलं. विशेष म्हणजे या मुलाचं उत्तर ऐकून तुम्ही देखील त्या मुलाकडं इतक्या लहान वयात असलेल्या स्वाभिमान आणि समजुतदारपणाचं कौतुक कराल. या मुलानं असं नेमकं काय म्हटलं हे या बातमीतून जाणून घेऊयात.