
बीड, ता. २४ : विधानसभा निकालानंतर आपल्या तोफेचे तोंड परळीकडे वळवून मंत्री पंकजा मुंडेंवर निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या फैरी झाडणाऱ्या सुरेश धसांकडून आणखीही परळीवरील वॉर सुरुच आहेत. आता तर त्यांनी अन्याय - अत्याचारामुळे २०० कुटूंबियांनी परळी सोडल्याचा गंभीर आरोप केला आहे. सुरुवातीला कॉल डिटेल्स शोधून चौकशी करा म्हणणारे धस यांनी खुन प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव घेत धनंजय मुंडे यांचेही थेट नाव घेत विविध आरोपांना सुरुवात केली आहे.