
शेगाव : तालुक्यात ११ गावात केस गळती होऊन टक्कल पडत असल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते.त्यानंतर आरोग्य विभाग कडून दखल घेण्यात आली आणि या भागात सर्व्हेक्षण आणि तपासणी करण्यात आली.उपचार नंतर प्रमाण कमी झाले आहे. हा प्रकार नेमका कशामुळे होत आहे. याबाबत ठोस पुरावे उपलब्ध नसल्याने या विषयावर विविध तज्ञ आरोग्य संस्था प्रतिनिधी बाधित गावांना भेट देत आहेत.