Maharashtra : माजी केंद्रीय मंत्र्यासोबतची ती रम्य व ऊर्जावान सायंकाळ...

या वयात काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत कसा पळेन आता पूर्वीसारखी स्थिती, तसे कार्यकर्ते नसल्याची खंत व्यक्त केली.
Maharashtra
Maharashtra sakal
Updated on

महाराष्ट्र : ती रम्य व ऊर्जावान सायंकाळ... रोजच्याप्रमाणे संध्याकाळची व्हीडिओ काॅन्फरन्स झाली आणि विनायक सभागृहाकडून एक चक्कर म्हणजे इव्हिनिंग वाॅकला निघालो... रस्त्यात समोरून सात-आठजण येत असल्याचे दिसले. तशी तर ही काॅलनी निर्मनुष्यच.. म्हणून तर संध्याकाळी चक्कर मारायचे रोजचे ठिकाण... गर्दी जसजशी जवळ आली.. पाहतो तर काय माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब आणि कार्यकर्ते येत होते. जनवात्सल्य हे त्यांचे निवासस्थान आमच्या रोजच्या वाॅकींग ट्रॅकवर... त्यांच्या निष्ठावंत अकबरची दररोज भेट... आज शिंदे साहेबांची भेट.. नेहमीच्याच करड्या आवाजात त्यांनी विचारले.. अभयजी इकडे कुठे... आम्ही दररोजच या सोसायटीत येतो अकबरशी बोलून तुमची ख्यालीखुशाली विचारतो असे सांगताच.. मग आज चला आमच्याबरोबर असे ते म्हणाले.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त पितृतुल्य मधुकर भावे कोराडीच्या फार्म हाऊसवर शुभेच्छा देण्यासाठी आले होते, असे त्यांनी आवर्जून सांगितले. आपण कधीच वाढदिवस साजरा करत नाही. पण दरवर्षीचा पायंडा ते चुकवत नसल्याचे सांगत असतानाच गप्पांच्या ओघात एक राऊंड पूर्ण झाला. त्यांनी मोबाईल पहात आता एक हजार पावले झाली. चला अजून एक राऊंड असे म्हणत सात रस्त्यावरील आपटे ज्वेलर्सपासून यू टर्न घेतला. दररोजचे टार्गेट किती असे विचारता सहा हजार पावले चालतो असे त्यांनी सांगितले. आज सिद्धेश्वर उशिथा आल्याने वाॅकींग झाले नसल्याचे सांगितले. गप्पांचा मूड होता.

साहेब तसा तर पार मोठा माणूस पण गप्पांची रंगत वाढवताना माझ्याबरोबर थोडी हसीमजाकही करतात. त्याचा पुन्हा प्रत्यय आला. गुजराती समाजाचा कार्यक्रम, पुणे, नाशिक दौरा, या वयातही होत असलेले दौरे यावर बोलता बोलता मी हळूच संधी साधत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आपल्या नावाची चर्चा होत असल्याबद्दल विचारले.

या वयात काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत कसा पळेन आता पूर्वीसारखी स्थिती, तसे कार्यकर्ते नसल्याची खंत व्यक्त केली. पक्षादेश मानणारे तुम्ही तसा आदेश आला तर... या प्रश्नावर मात्र ते थांबले. या वयातही त्यांचा चालण्याचा वेग, उत्साह वाखाणण्याजोगाच... यावेळी पत्रकारांच्या गृहप्रकल्पाची त्यांनी आवर्जून माहिती घेतली. फार दिवसांनी त्यांची झालेली भेट, इव्हिनिंग वाॅक, गप्पा यामुळे ती संध्याकाळ रम्य व ऊर्जावान वाटली. यावेळी उद्योजक राजकुमार राठी, नगरसेवक चेतन नरोटे, श्री. मुलतानीया, तात्यासाहेब पवार, मनिष केत आदी सोबत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com