Sushma Andhare : "संजय राऊत लांब पल्ल्याची तोफ; त्यांची भेट ऊर्जादायी" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut Sushma Andhare
Sushma Andhare : "संजय राऊत लांब पल्ल्याची तोफ; त्यांची भेट ऊर्जादायी"

Sushma Andhare : "संजय राऊत लांब पल्ल्याची तोफ; त्यांची भेट ऊर्जादायी"

शिवसेना खासदार संजय राऊत यांची नुकतीच पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामिनावर सुटका झाली आहे. त्यानंतर त्यांनी अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. नुकतीच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही राऊतांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी राऊतांचा उल्लेख लांब पल्ल्याची तोफ असा केला आहे.

हेही वाचा: Sushma Andhare : मेहंदीवाल्याचा हिशोब मागता, पण बीकेसी सभेचा हिशोब का मागत नाही?

याबद्दल सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टही लिहिली आहे. आपल्या पोस्टमध्ये अंधारे म्हणतात, "शिवसेनेतली सगळ्यात लांब पल्ल्याची तोफ, गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व सन्माननीय संजय राऊत साहेबांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बऱ्याच दिवसानंतर मनमोकळ्या गप्पा झाल्या. तब्बल 102 दिवस मला पक्षात येऊन झालेत आणि तब्बल 102 दिवसांनी सन्माननीय राऊत साहेब हे आमच्या सगळ्यांना भेटीसाठी उपलब्ध झालेत हा एक योगायोगच म्हणावा परंतु एक नक्की राऊत साहेबांच्या येण्याने खूप ताण कमी झाल्यासारखा वाटत आहे थोडेसे हलके वाटत आहे आणि सोबतच शिवसेनेची ताकद दहा पटीने वाढली आहे.

आपण संजय राऊतांशी काय बोललो हे सांगताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "राऊत साहेबांना म्हटलं, सर आम्ही खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न केला आमच्या आमच्या परीने खिंड लढवली फार मोठे काही नाही केलं.राउत साहेब उत्तरले, तुम्ही ही खिंड निकराने लढलात म्हणजेच ही देखील पावनखिंड झाली. माझ्यासारख्या एका छोट्य़ा शिवसैनिकासाठी ही फार मोठी पोच पावती आहे.