Sushma Andhare : 'हा तर ट्रेलर.. तुमच्यासाठी स्पेशल एपिसोड घेऊन येणार', सुषमा अंधारेंचा सावंतांना इशारा

Sushma Andhare
Sushma Andharesakal

मुंबईः ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना जशासतसं उत्तर दिलं आहे. तुमच्यासाठी स्पेशल एपिसोड घेऊन येत असल्याचा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.

परभणी येथे बोलतांना तानाजी सावंत यांनी सुषमा अंधारे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. सुषमा अंधारे यांचा पूर्ण सर्च रिपोर्ट आमच्याकडे आहे. आमच्या रणरागिनी शांत आहेत. त्या ज्यावेळी मैदानात उतरतील तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असं सावंत म्हणाले होते.

Sushma Andhare
Crime news : पतीनेच केले स्वतःच्या पत्नीचे अपहरण! मित्रांसमवेत बलात्कार करून अशी केली हत्या...

यासह तानाजी सावंत यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेसने एका महिलेला ठाकरे गटाकडे भाडेतत्वावर दिलं आहे. त्यावरही सुषमा अंधारे भडकल्या.

त्यावर बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी राष्ट्रवादीची प्राथमिक सदस्यही नव्हते . माझा आणि राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही. सावंत हे नाकाने वांगे सोलत आहेत. राहुल नार्वेकर, दीपक केसरकर, उदय सामंत, किरण पावस्कर, प्रकाश सुर्वे हे राष्ट्रवादीचं पार्सल आहेत की परग्रहावरुन आले आहेत, याचं उद्या सामंतांनी उत्तर द्यावं, असं अंधारे म्हणाल्या.

Sushma Andhare
10th SSC Result 2023: उद्या १ वाजता लागणार दहावीचा निकाल, या वेबसाइटवर मिळेल संपूर्ण माहिती

'हा फक्त ट्रेलर आहे. मी तुमच्यासाठी स्पेशल एपिसोड घेऊन येणार आहे.' असा इशारा सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंत यांना दिला. त्या गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या.

संजय शिरसाट यांना क्लिनचिट

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विनयभंग प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांना क्लीनचिट मिळाली आहे. पोलिसांनी संजय शिरसाट यांना क्लीनचिट देण्याचा निर्णय घेतला आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावेळी अंधारे तिथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे समोर व्यक्ति नसल्यामुळे विनयभंग होत नाही असा निष्कर्ष देण्यात आला आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलेल्या विनयभांगाच्या प्रकरणात संजय शिरसाट यांना पोलिसांकडून क्लीनचिट देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com