Sushma Andhare: मुख्यमंत्र्यांच्या बुद्ध्यांकावर सुषमा अंधारे घसरल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Andhare

Sushma Andhare: मुख्यमंत्र्यांच्या बुद्ध्यांकावर सुषमा अंधारे घसरल्या

'आम्ही मराठा मुख्यमंत्री दिला. मात्र त्या मुख्यमंत्र्याला बुध्यांक नाही' शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेले हे वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Sushma Andhare Slams CM Eknath Shinde bjp maharashtra politics )

सुषमा अंधारे काल धरमगाव दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी तेथील गावकऱ्यांना संबोधीत केले. माध्यामांशी संवाद साधताना त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

वेदांता प्रकल्पानंतर राज्यातून अनेक प्रकल्प बाहेर गेले आहेत. हाच मुद्दा हाती घेत अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर टोलेबाजी केली. 'ज्याला ज्यातलं कळत नाही. त्यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळेच राज्यातील प्रकल्प बाहेर जात आहे. एक एका प्रकल्पामुळे राज्यातील लाखो मुलांना रोजगार मिळाला असता.

गुजरातमधील माणसंही आमचीच आहेत. पण गुजरातचं भलं करण्यासाठी त्यांनी त्यांच्या नेत्यांना निवडून दिलं आहे. तुम्हाला महाराष्ट्राचं भलं करण्यासाठी राज्यातील जनतेने निवडून दिलं आहे. तरीही तुम्ही आपले प्रकल्प बाहेरच्या राज्यात जाऊच कसे देता? असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलून उपयोग नाही. एकनाथ शिंदे यांचा ऐकनाथ करून टाकण्यात आला आहे. फडणवीस शिंदे यांचा वारंवार अपमान करतात. त्यांच्या समोरचा माईक हिसकावून घेतात.

हे प्रकार जाणीवपूर्वक केले जात आहे. आम्ही मराठा मुख्यमंत्री दिला. मात्र त्या मुख्यमंत्र्याला बुध्यांक नाही, हे बिंबावल्या जात आहे. हे जाणीवपूर्वक केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. मात्र, राजकीय वर्तुळात मुख्यमंत्र्याला बुध्यांक नाही त्यांचे वक्तव्य अधिक चर्चेत आलं आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप आता काय उत्तर देत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.