Sushma Andhare Vs Vaijnath Waghmare: सुषमा अंधारे पतीपासून वेगळ्या का झाल्या? वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Andhare Vs Vaijnath Waghmare

Sushma Andhare Vs Vaijnath Waghmare: सुषमा अंधारे पतीपासून वेगळ्या का झाल्या? वाचा सविस्तर

मुंबईः साधारण चार ते पाच वर्षांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ह्या त्यांचे पती वैजनाथ वाघमारे यांच्यापासून वेगळ्या झाल्या. त्यांचे पती हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे हे दाम्पत्य विभक्त का झालं? असा प्रश्न उपस्थित होतोय. याचं उत्तर आता वैजनाथ वाघमारे यांनीच दिलंय.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. प्रवेशापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सुषमा अंधारे भलेही इतिहासाचे दाखले देत असलीत परंतु त्यांना इतिहासाची पुस्तकं कुणी दिली? हा खरा प्रश्न आहे. आम्ही सोबत १५ वर्षे काम केले आहे. त्यांना एक वेगळा नेता बनवायचं होतं. परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांनी पक्षप्रवेश करु नये, असं मला वाटत होतं. त्यांचा हा निर्णय मला पटला नाही. त्यामुळे आम्ही विभक्त झालो, असं स्पष्टीकरण वैजनाथ वाघमारे यांनी दिलं.

दरम्यान, वैजनाथ वाघमारे यांच्या पक्षप्रवेशावर बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या की, वैजनाथ वाघमारे यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. कोण कोणत्या गटात जातं याने मला फरक पडत नाही. ज्याला त्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. सुषमा अंधारे यांनी दीपाली सय्यद यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.