ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला; शेट्टींचा महाविकास आघाडीवर 'प्रहार'

Raju Shetti vs Mahavikas Aghadi Government
Raju Shetti vs Mahavikas Aghadi Governmentesakal
Summary

उद्धव ठाकरेंच्या राजीनामा नाट्यानंतर राजू शेट्टींनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय.

Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (बुधवार, 29 जून) ऑनलाइन येवून राजीनाम्याची घोषणा केली. तसेच विधानपरिषद सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी भावनिक संवाद साधला. ते म्हणाले, लोकशाहीचा डोकी मोजायचा खेळ मला खेळायचा नाही. शिवसेना (Shiv Sena) प्रमुखाच्या मुलाला शिवसैनिकांनीच मुख्यमंत्री पदावरुन उतरवलं. मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत नाही. मी आज मुख्यमंत्रीपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचाही त्याग करत आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या राजीनामा नाट्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनो, स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीच्या आड्यांचा तुम्ही एक-एक बांबू उपसला; पण ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला! देवाच्या काठीला आवाज नसतो!!' असं ट्विट राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलंय.

Raju Shetti vs Mahavikas Aghadi Government
हिंदुत्त्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर ही वेळ..; काय म्हणाले पाटील?

एकनाथ शिंदे यांनी बंड करत चाळीसहून अधिक आमदार सुरुवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला घेऊन जात बंड केला. त्यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) अल्पमतात आलं होतं आणि या सगळ्या राजकीय नाट्यानंतर काल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आज 30 जून रोजी फ्लोर टेस्ट करण्याचे निर्देश दिले. राज्यपालांच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. काल सायंकाळी पाच वाजता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि उद्याच (30 जून) बहुमत चाचणी घेण्यावर सर्वोच्च न्यायालय सुद्धा ठाम राहिलं. या निकालानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ठाकरेंच्या राजीमान्यामुळं आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटानं भाजपाशी बोलणी सुरु केलीय. तर, दुसरीकडं महाविकास आघाडी सरकार कोसळताच भाजपाच्या (BJP) गोटात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com