"अरे मूर्खा कुठे भटकतोस?" पोंक्षेंचे अंदमानमधून राहुल गांधींना चॅलेंज, Video Viral | Swatantryaveer Savarkar rahul gandhi sharad ponkshe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

"अरे मूर्खा कुठे भटकतोस?" पोंक्षेंचे अंदमानमधून राहुल गांधींना चॅलेंज, Video Viral

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले असून हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपकडून ठिकठिकाणी निदर्शने आणि आंदोलने चालू आहेत. हा वाद सुरू असतानाच अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक व्हिडिओ शेअर करत थेट राहुल गांधींना चॅलेंज केलं आहे.

(Sharad Ponkshe's Video Viral)

हेही वाचा - का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

शरद पोंक्षे यांनी अंदमान येथील सेल्युलर जेलमधील व्हिडिओ शेअर केला आहे. सावरकर जेलमधील ज्या खोलीत राहिले त्या खोलीमध्ये जाऊन त्यांनी व्हिडिओ शूट केला असून "या खोलीत एक दिवस सावरकर राहिले त्या अवस्थेत राहून दाखव." असं म्हणत राहुल गांधींना चॅलेंज केलं आहे.

हेही वाचा: Video : याला म्हणतात नशीब! मगरीच्या तोंडातून अन् मरणाच्या धाडेतून बाहेर पडला कासव

दरम्यान, राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्याला विरोध करताना मनसे आणि भाजपने निदर्शने केले आहेत. भाजपकडून राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. तर मनसेकडून भारत जोडो यात्रा रोखण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याचबरोबर ही यात्रा व्यवस्थित पार पडण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहलं आणि आपण किती शूरवीर होतो हे सांगितलं. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.