बीड जिल्ह्यात काढली मनोहर भिडे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा; रयत क्रांती संघटना आक्रमक

Manohar Bhide
Manohar Bhide
Updated on

बीड - मागील काही दिवसांपासून मनोहर भिडे सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यांच्या विधानांमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. भिडेंनी महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केली होती. याविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Manohar Bhide
Nitin Desai News : "...ही वेळ कशामुळे आली याचा छडा लागला पाहिजे"; नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंची मागणी

बीड जिल्ह्यातही रयत क्रांती संघटनेकडून मनोहर भिंडे यांच्याविरोधात तीव्र आंदोलन कऱण्यात आले. यावेळी आष्टी तालुक्यातील कडा येथे मनोहर भिडे यांच्या निषेधार्थ निषेध अंत्ययात्रा काढण्यात आली.

मनोहर भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. कडा येथे संविधान प्रेमी, जिजाऊ ब्रिगेड, सामाजिक आणि शेतकरी संघटनेच्या वतीने चक्क भिडेंची अंत्ययात्रा काढून लक्ष वेधण्यात आले. कडा गावातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार देखील करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com