तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांना मुंबई विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लॉ ही मानद पदवी

प्रसिद्ध उद्योजक शशिकांत गरवारे यांना डॉक्टर ऑफ लीटरेचर (डी.लिट. ) ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
zakir husain
zakir husaingoogle

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या वतीने जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध तबला वादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना डॉक्टर ऑफ लॉ (एल.एल.डी. ) व प्रसिद्ध उद्योजक शशिकांत गरवारे यांना डॉक्टर ऑफ लीटरेचर (डी.लिट. ) ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. ही पदवी १२ मे या दिवशी विशेष दीक्षान्त समारंभामध्ये राज्याचे राज्यपाल तसेच विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठाने मानद पदवी प्रदान करण्यासाठी विशेष दीक्षान्त समारंभ गुरुवार, दि. १२ मे २०२२. रोजी सकाळी ११:०० वाजता विद्यापीठाच्या फोर्ट येथे सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित केला आहे.

जागतिक किर्तीचे तबला वादक पदमभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना डॉक्टर ऑफ लॉ (एल.एल.डी. ) ही मानद पदवी तसेच गरवारे उदयोजक समूहाचे प्रमुख शशिकांत गरवारे यांना डॉक्टर ऑफ लीटरेचर (डी.लिट.) त्यांच्या संबंधित क्षेत्रांतील योगदानाबद्दल मानद पदवी देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या प्राधिकरणाने घेतला आहे. यापूर्वी विद्यापीठाने प्रसिद्ध कृषितज्ज्ञ स्वामिनाथन यांना डिलिट ही मानद पदवी देण्यात आली होती.

विशेष दीक्षान्त समारंभानंतर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन व इतर विशेष कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या विशेष दीक्षान्त समारंभाचे थेट प्रक्षेपण युट्युबवर https://m.youtube.com/c/UniversityofMumbai_UoM या लिंकवर करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com