अरे व्वा... ताडोबा, पेंच प्रकल्पाबाबत पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, वाचा सविस्तर 

राजेश रामपूरकर
Monday, 14 September 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्याघ्र प्रकल्पांनी नियमांचे पालन करण्यावर भर दिला आहे. त्यात सामाजिक अंतर पाळणे, प्रवेशव्दारातून पर्यटकांना प्रवेश देण्यापूर्वी पर्यटक, जिप्सी चालक, मार्गदर्शक यांच्या शरीराचे तापमान थर्मल स्कॅनर आणि इन्फ्रारेड थर्मामीटरने तपासण्यात येणार आहे. हे सामान्य असल्यास प्रवेश देण्यात येणार आहे. ताप, सर्दी, खोकला असलेल्या, आजारी पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती जवळच्या कोविड सेंटरला देण्यात येणार आहे. 

नागपूर : टाळेबंदीनंतर अंशतः सुरू असलेले पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्प आता एक ऑक्टोंबरपासून निसर्ग पर्यटनासाठी नियमित सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली असून रस्त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर केली जात आहे. राज्य शासन आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार जिप्सी चालक, मार्गदर्शक आणि चार पर्यटक एवढ्याच पर्यटकांना निसर्ग पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. १० वर्षाखालील, ६५ वर्षावरील व्यक्ती व स्त्रियांना पर्यटनास मज्जाव केला आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्याघ्र प्रकल्पांनी नियमांचे पालन करण्यावर भर दिला आहे. त्यात सामाजिक अंतर पाळणे, प्रवेशव्दारातून पर्यटकांना प्रवेश देण्यापूर्वी पर्यटक, जिप्सी चालक, मार्गदर्शक यांच्या शरीराचे तापमान थर्मल स्कॅनर आणि इन्फ्रारेड थर्मामीटरने तपासण्यात येणार आहे. हे सामान्य असल्यास प्रवेश देण्यात येणार आहे. ताप, सर्दी, खोकला असलेल्या, आजारी पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती जवळच्या कोविड सेंटरला देण्यात येणार आहे. 

अरे हे काय... सोन्याचे भाव घटले, तरीही ग्राहक फिरकेना, या महिन्यात दरवाढ होण्याचे संकेत

चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक राहील. त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. वापरलेले मास्क, हातमोजे, फेस शिल्ड, पाण्याच्या बाटला आदी साहित्य वन क्षेत्रात अथवा अन्यत्र फेकली जाणार नाही अशी तंबीही देण्यात येणार आहे. पर्यटन वाहनात बसण्यापूर्वी सर्वांना हात सॅनिटाईझ करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय जिप्सीत कोणालाही बसता येणार नाही व प्रवेशही दिली जाणार नाही. जिप्सी चालकांनी प्रवेशद्वारावर येण्यापूर्वी गाडीची साफसफाई आणि सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे. 

अधिवासाच्या लढाईत वाघाचा मृत्यू, गेल्या नऊ महिन्यांत राज्यात तब्बल एवढे मृत्यू 

पेंच व्याघ्र प्रकल्पातील मानसिंगदेव, उमरेड- कऱ्हांडला-पवनी अभयारण्य व बोर व्याघ्र प्रकल्प सुरू करण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी एक आक्टोंबरपासून नियमित पर्यटन सुरू होईल असे सूत्रांनी सांगितले. 

स्वच्छतागृहाचेही वारंवार निर्जंतुकीकरण 

पर्यटकांनी स्वच्छतागृह वापरल्यानंतर त्याचे तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तसेच जिप्सीच्या टायरही प्रवेशापूर्वी स्वच्छ केले जाणार आहे. तशी सुविधा उभारण्यात आलेली आहे. पर्यटकांकरिता १६ सप्टेंबरपासून ऑनलाइन बुकिंग www.mytadoba.org या संकेतस्थळावर सुरू करण्यात येणार आहे असे ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी कळविले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tadoba, Pench Project Will Start from First October