Tadoba Tigress Zinat Gives Birth
esakal
चंद्रपूर : महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ओडिशातील सिमलीपाल व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यात आलेल्या 'झिनत' वाघिणीने चार शावकांना जन्म दिला आहे. यामुळे सिमलीपाल येथील व्याघ्र संवर्धन प्रयत्नांना नवी ऊर्जा मिळाली आहे. ओडिशातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या आनुवंशिक विविधतेत वाढ करून त्यांच्या लोकसंख्येचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने व्याघ्र स्थलांतर मोहीम राबविण्यात आली होती.