Rupali Chakankar : मनोहर भिडे यांच्यावर तातडीने कारवाई करा; चाकणकरांची फडणवीसांकडे मागणी

Rupali Chakankar, Devendra Fadnavis and Manohar Bhide
Rupali Chakankar, Devendra Fadnavis and Manohar Bhide

Mumbai News - श्री शिवप्रतिष्ठानचे मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. एकीकडे भाजप भाजपकडून भिडे यांचा बचाव करण्यात येत आहे. तर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्याचवेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचा अजित पवार गट भिडेंविरोधात आक्रमक झाला आहे.

Rupali Chakankar, Devendra Fadnavis and Manohar Bhide
Jaipur-Mumbai Express Firing : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं? GRP आयुक्तांनी सांगितला घटनाक्रम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिडे यांच्यावर कारवाई कऱण्याची मागणी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसूर्य महात्मा फुले तसेच लाखोंचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांबद्दल मनोहर भिडे यांनी केलेली वक्तव्य निंदनीय, निषेधार्ह आणि संतापजनक आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपित्याचा अवमान करणे तसेच त्यांच्या मातोश्री असलेल्या एका महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत जाहीरपणे आक्षेपार्ह भाष्य करणे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.

Rupali Chakankar, Devendra Fadnavis and Manohar Bhide
Maharashtra Politics : अधिवेशन संपताच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार? भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांमध्येही अंतर्गत खांदेपालट

चाकणकर पुढे म्हणाल्या की, वारंवार वादग्रस्त विधाने करणाऱ्या मनोहर भिडेंवर शासनाने तातडीने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी माझ्या विधानाचा विपर्यास केला असं म्हणून भिडे पळवाट शोधतात आणि त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही हे चुकीच आहे. महात्मा गांधींचा देश हीच भारताची जगभरातील ओळख आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा अपमान महाराष्ट्र सरकार सहन करणार नाही हे शासनाने कृतीतून दाखवून दिले पाहिजे, अशी मागणी चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com