Jaipur-Mumbai Express Firing : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं? GRP आयुक्तांनी सांगितला घटनाक्रम

Jaipur-Mumbai Express Firing
Jaipur-Mumbai Express Firingesakal

Jaipur-Mumbai Exp Firing : जयपूर-मुंबई एक्प्रेसमध्ये आज पहाटे हवालदार चेतन सिंहने गोळीबार केला. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन प्रवाशी आणि एका सहाय्यक उपनिरीक्षकाचा समावेश आहे. ही घटना वापी आणि पालघरदरम्यान पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली.

पहाटे घटडेल्या या थरारक घटनेची सविस्तर माहिती रेल्वे पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे. जीआरपीचे आयुक्त रविंद्र शिसवे म्हणाले की, जयपूरहून मुंबईकडे येणाऱ्या जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने वापी स्टेशन सोडल्यानंतर ट्रेनमधील कॉन्स्टेबल चेतन सिंग याने एएसआय टिकाराम मीना आणि बोगीमधल्या तीन लोकांवर फायरिंग केलं.

Jaipur-Mumbai Express Firing
Shirsat Vs Chaturvedi: "...जर आम्ही चारित्र्य काढलं तर बात लंबी चलेगी"; शिरसाटांचं चतुर्वेदींना प्रत्युत्तर

आयुक्तांनी पुढे सांगितलं की, या घटनेत चार लोकांचा मृत्यू झाला. जेव्हा जयपूर-मुंबई एक्स्प्रेस पुढे आली तेव्हा कुणीतरी पॅसेंजरने सुरक्षेसाठी चैन खेचली. त्याचवेळी चेतन सिंगने गाडीतून उतरुन जाण्याचा प्रयत्न केला. मीरा रोड येथे हा प्रकार घडला. मात्र त्याच वेळी जीआरपीएफ आणि आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी चेतन सिंगला धाडसाने पकडलं.

आयुक्तांनी पुढे सांगितलं, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. रेल्वे कर्मचारी, आरपीएफचे जवान, प्रवाशी यांच्याकडे चौकशी सुरु असून बचावलेल्या दोन कर्मचाऱ्यांकडूनही माहिती घेतली जात असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं. आरोपी चेतन सिंह याने नेमका गोळीबार का केला, याबद्दल त्यांनी काहीही सांगितलं नाही.

Jaipur-Mumbai Express Firing
Deepak Kesarkar: मी शिर्डीत प्रार्थना केली अन्‌ कोल्‍हापूरची पूरस्थिती टळली! केसरकर यांचा दावा

अजून तपास सुरु असून एफआयआरनंतर आरोपीला बोरीवली कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. प्रकरणाचा तपास झाल्याशिवाय काहीही बोलणं चुकीचं ठरेल, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com