तारीख ठरली! महाराष्ट्रात तमाशाचे फड पुन्हा सुरू होणार

Tamasha Will Start Again in Maharashtra
Tamasha Will Start Again in MaharashtraSakal

कोरोनाची रुग्णसंख्या घसरायला लागल्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे राज्यात सार्वजनिक कार्यक्रमांना काही प्रमाणात परवानगी देण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलली आहेत. सध्या नाट्यगृह आणि चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने सुरू आहे. दोन्ही लस घेतलेल्या आणि युनिव्हर्सल पास असलेल्या व्यक्तींना त्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच आता तमाशा कलावंतांसाठीही मोठी बातमी आली आहे. (Folk Art Tamasha)

तिसऱ्या लाटेच्या उद्रेकामुळे राज्यातील जत्रा आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. गावात सुरू झालेल्या बैलगाडा शर्यती देखील प्रशासनाने कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यामुळे बंद करण्यात आल्या. (Tamasha Will Start Again in Maharashtra)

ग्रामीण भागातील जत्रांमध्ये मुख्य आकर्षण ठरणारे तमाशे आणि लावणी कलावंतांना मात्र, आता दिलासा मिळाला आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून राज्यात तमाशा कार्यक्रमांना सरकारने परवानगी दिली आहे.

अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर यासंदर्भात चर्चाही झाली. अखेर राज्यात १ फेब्रुवारीपासून तमाशा सुरू करण्यात मुभा दिली आहे. कोरोना काळात नुकसान झाल्याने तमाशा कलावंतांसाठी सरकारने १ कोटी रुपये जाहीर केल्याची माहिती खेडकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com