खेकड्याने फोडलेल्या धरणात मंत्रीपद वाहुन गेले 

अशोक मुरुमकर 
Monday, 30 December 2019

सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीवेळी शिवसेनेची उमेदवारी प्रा. सावंत यांच्या हस्तक्षेपामुळे करमाळा मतदार संघातील नारायण पाटील यांना मिळाली नाही. याबरोबर सोलापूर मध्य मतदारसंघातही सावंत यांच्यामुळे कॉंग्रेसमधून शिवसेनेते प्रवेश केलेल्या माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी मिळाल्याने महेश कोठे यांचीही उमेदवारी हुकली.

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा बहुचर्चीत मंत्री मंडळाचा विस्तार सोमवारी झाला. यामध्ये सोलापूर जिल्ह्याला स्थान न मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसऱ्याबाजुला प्रा. तानाजी सावंत यांनाही मंत्रीपद न मिळाल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका सुरु केली आहे. "खेकड्याने फोडलेल्या धरणात मंत्रीपद पाहुन गेले', असे उपरोधकपणे म्हणत प्रा. सावंत यांना धारेवर धरले आहे. 

हेही वाचा : आदित्य ठाकरेंना मिळणार कॅबिनेट आणि "हे' खाते निश्‍चित? 
सावंत यांच्यामुळे पराभव 

सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीवेळी शिवसेनेची उमेदवारी प्रा. सावंत यांच्या हस्तक्षेपामुळे करमाळा मतदार संघातील नारायण पाटील यांना मिळाली नाही. याबरोबर सोलापूर मध्य मतदारसंघातही सावंत यांच्यामुळे कॉंग्रेसमधून शिवसेनेते प्रवेश केलेल्या माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी मिळाल्याने महेश कोठे यांचीही उमेदवारी हुकली. करमाळा आणि सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघात शिवसेनेकडुन चुकीच्या उमेदवारी गेल्याने या दोन्ही जागांवर पराभव पत्कारावा लागल्याचा आरोप केला जात आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सावंत यांना मंत्रीपद मिळेल, अशी शक्‍यता वर्तवली जात होती. मात्र त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. प्रा. सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 
महाराष्ट्रात 2019 ची विधानसभा निवडणूक होण्याआधी प्रा. सावंत हे यवतमाळ मतदारसंघातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून गेले होते. शिवसेनेनी त्यांना संधी दिली होती. त्यानंतर भाजप व शिवसेनेच्या महायुतीच्या सरकारमध्ये ते जलसंधारणमंत्री झाले होते. निवडणूकीमध्ये भाजप, शिवसेना व त्यांचे मित्रपक्ष यांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवली होती. त्यात भाजप व शिवसेनेला बहुमत मिळालेले असताना सुद्धा मुख्यमंत्रीपद न दिल्याने शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन केले. मांत्रीमंडळ स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार अशी चर्चा रंगली होती. 
मंत्रीमंडळामध्ये प्रा. सावंत यांना संधी न मिळाली नाही, त्यामुळे त्यांच्यावर नेटकऱ्यांकडून टीकास्त्र सोडले आहे. फेसबुकवरती गणेश जगताप यांनी म्हटले की, "जैसी करणी वैसी भरणी, 50 आमदार आणणार होता म्हणे...', तात्यासाहेब शिंदे यांनी म्हटले की, "खेकड्याने फोडलेल्या धरणात मंत्रीपद वाहुन गेले', श्रीकांत मारकड पाटील यांनी म्हटले की, "खेकडा पळाला', पाटील पाटील या ग्रुपवर म्हटले की, "पाटला म्होर कुणी नाद करायचा नाही अन्‌ नाद करायचा तो फकस्त पाटलानं कळलं का?' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tanaji Sawant criticizes for not getting Cabinet