
आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने आपल्या 13 मंत्र्यांची अंतिम यादी निश्चित केली आहे. यामध्ये शिवसेनेने आठ नव्या चेहऱ्यांना संधी देताना, दर दोन वर्षांनी मंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आदित्य ठाकरेंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच निवडून म्हणून आलेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना आज (सोमवार) होणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद मिळणार हे जवळपास निश्चित आहे. तसेच त्यांना नगरविकास खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने आपल्या 13 मंत्र्यांची अंतिम यादी निश्चित केली आहे. यामध्ये शिवसेनेने आठ नव्या चेहऱ्यांना संधी देताना, दर दोन वर्षांनी मंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आदित्य ठाकरेंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातून कोणीतरी निवडणूक लढले होते. अंधेरी मतदारसंघातून निवडून आलेल्या आदित्य ठाकरेंनी आपला ठसा उमटविण्यास सुरवात केली आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांच्याकडे नगरविकास या महत्त्वपूर्ण खात्याची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. कारण, मुंबई महापालिकेत आपला दबदबा कायम राखण्यासाठी शिवसेनेला हे खाते स्वतःकडेच ठेवावे लागणार आहे. ऐनवेळी तानाजी सावंत यांचा कॅबिनेट मंत्रिपदावरून नाव वगळण्यात आले आहे.
शिवसेनेचे ठरलं; ग्रामीण भागाला प्राधान्य आणि दर दोन वर्षांनी...
शिवसेनेने दोन वर्षांनी मंत्री बदलत ग्रामीण भागाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. तसेच जनतेतून निवडून आलेल्या आमदारांना संधी दिली आहे. शिवसेनेने मुंबईतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासह फक्त अनिल परब यांना संधी दिली आहे. त्यानंतर गुलाबराव पाटिल, संजय राठोड, उदय सामंत, दादा भुसे, शंभुराज देसाई, संदिपान भुमरे यांच्या बरोबरच अब्दुल सत्तार या नव्या शिवसैनिकालाही स्थान देण्यात आले आहे. यासह शिवसेनेने शंकरराव गडाख आणि बच्चू कडू या सहयोगी आमदारांनाही मंत्रीपद दिले आहे.