'ब्राह्मणाने 2017 मध्ये मराठ्यांची झोळी भरली'; तानाजी सावंतांचे वादग्रस्त विधान | Tanaji Sawant On Maratha Reservation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tanaji Sawant

'ब्राह्मणाने 2017 मध्ये मराठ्यांची झोळी भरली'; तानाजी सावंतांचे वादग्रस्त विधान

मुंबई : शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सरकारच्या काळात आरक्षण मिळेलच पण मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केले. त्याचबरोबर राष्ट्रवादीने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका घेतली असा आरोप त्यांनी केला आहे.

(Tanaji Sawant On Maratha Reservation)

"फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणावर प्रचंड टीका केली, जातीयवाद केला गेला. फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं गेलं पण त्याच ब्राह्मणानं २०१७ मध्ये मराठ्यांची झोळी भरली. मराठ्यांना नोकऱ्या मिळाल्या आणि ज्यावेळेस जनतेचा घात करून तुम्ही सत्तेत आलात तेव्हा सहाच महिन्यात आरक्षण गेलं आणि आत्ता सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. पण आम्ही आरक्षण देणार, तेही टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देणारच" असं वक्तव्य सावंत यांनी केलं.

हेही वाचा: Boat Accident : बांगलादेशमध्ये नदीत बोट उलटून 24 जणांचा मृत्यू

दरम्यान, देवेंद्र फडणवीस या ब्राह्मणाने मराठ्यांची झोळी भरली या त्यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर तुम्हाला आत्ताच आरक्षणाची खाज सुटली का? असंही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. तर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाच्या मोर्चावर टीका करण्यात आली, मुका मोर्चा म्हणून हिणवण्यात आलं अशी टीकाही त्यांनी केली आहे. तर मराठा समाजाच्या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.