पहिली ते चौथी शाळा सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी | Schools | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 school

पहिली ते चौथी शाळा सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी

मुंबई: पहिली ते चौथीपर्यंतची शाळा (School) सुरू करण्याबाबत टास्क फोर्सने (Task force) ग्रीन सिग्नल दिला आहे. नियम पाळून शाळा सुरू करायला हरकत नाही, असं टास्क फोर्सचं म्हणणं आहे. लांब राहून खेळता येणाऱ्या मैदानी खेळांनाही परवानगी देण्यात येईल. क्रिकेट, धावण्याची शर्यतीला परवनगी असेल. पण खो खो कब्बडीला परवानगी मिळणार नाही.

चाईल्ड टास्क फोर्सच्या बैठकीत डॉक्टरांचं एकमत झालं आहे. गतिमंद मुलांच्या शाळाही नियम पाळून सुरू करायला हरकत नसल्याचं टास्क फोर्सचं मत आहे. वस्तीगृहात राहाणाऱ्यांची सुरुवातीला RTPCR टेस्ट करून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात येऊ शकतो.

हेही वाचा: भाड्याच्या घरात राहताय? 'इन्कम टॅक्स रिटर्न्स' वर मिळणार सवलत

एखादा व्यक्ती पुन्हा बाहेर गेला, तर पुन्हा येताना RTPCR टेस्ट सक्तीची करावी. केंद्राशी बोलून लहान मुलांच्या लसीकरणाबाबत तत्परता राज्याने दाखवावी. शाळा सुरू करत लसीकरण केल्यास काहीच त्रास नसल्याचं डॉक्टरांच मत आहे. नुकताच टास्क फोर्सने आपला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे.

टॅग्स :task force