
शिक्षक बनले रिक्षाचालक; कोविड रुग्णांना मोफत पोहोचवतात रुग्णालयात
कोरोना (covid) विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही सध्या लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडता येत आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये मुंबईत राहणारे शिक्षक दत्तात्रेय सावंत (teacher dattatraya sawant) दररोज घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही नियमांचं उल्लंघन करण्यासाठी नव्हे तर देशसेवा करण्यासाठी ते घराबाहेर पडत असल्याचं समोर आलं आहे. (teacher dattatraya sawant are giving auto rickshaw rides to covid patients for free)
शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे बेड व ऑक्सिजन सिलेंडरप्रमाणेच रुग्णवाहिकांचीदेखील कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळेच या काळात रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सातत्याने रिक्षा चालवत आहेत. दत्तात्रय सावंत एकीकडे शिक्षकपदाची भूमिका बजावत आहेत. तर, दुसरीकडे गरजू रुग्णांचीदेखील मदत करत आहेत.
हेही वाचा: कोरोना : लहान मुलांमध्ये आढळणारी प्रमुख लक्षण
कोरोना काळात अनेक जण आर्थिक संकंटांना सामोरं जात आहेत. त्यातच कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालय गाठण्यासाठी होणारी धावपळ या सगळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. म्हणूनच दत्तात्रय सावंत त्यांच्या रिक्षातून रुग्णांना रुग्णालयापर्यंत मोफत सेवा देत आहेत.
"सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच वेळीच उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. इतकंच नाही तर अनेक गरजूंपर्यंत योग्यवेळी सरकारी मदतही पोहोचत नाहीये. एकीकडे रुग्णवाहिका वेळेवर मिळत नाहीये. तर दुसरीकडे खासगी रुग्णवाहिकांचं बील गरजुंना परवडत नाही. त्यामुळेच मी अशा गरजुंना मोफत सेवा देण्याचा निर्धार केला", असं सावंत म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "आतापर्यंत मी २६ कोविड रुग्णांना मोफत रुग्णालयापर्यंत पोहोचवलं आहे."
दरम्यान, कोरोना रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यापूर्वी सावंत सोशल डिस्टंसिंग व अन्य नियमांचं काटेकोरपणे पालन करत आहेत. पीपीई कीटचा वापर, रिक्षा सॅनिटाइज करणे या सगळ्या गोष्टींची ते काळजी घेत आहेत.
Web Title: Teacher Dattatraya Sawant Are Giving Auto Rickshaw Rides To Covid Patients For
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..