
कोरोना : लहान मुलांमध्ये आढळणारी प्रमुख लक्षण
चीनच्या वुहान प्रांतातून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने (corona virus) संपूर्ण जगाला कवेत घेतलं आहे. सध्या देशात या विषाणूची दुसरी लाट आली असून आतापर्यंत अनेकांना या विषाणूचा फटका बसला आहे. त्यातच आता देशात तिसरी लाटदेखील (third wave corona) येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक फटका बसणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुलांमध्ये कोरोनाची लक्षण (symptoms) आढळल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. यामध्येच लहान मुलांमध्ये कोरोनाची नेमकी कोणती लक्षण जाणवतात हे पुण्यातील मदरहूड हॉस्पिटलचे नवजात शिशूतज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. तुषार पारीख यांनी सांगितलं आहे. (corona virus third wave corona symptoms in child)
हेही वाचा: 'मला मरायचं नाहीये, मला माझ्या बहिणीला पाहायचं आहे'; मन हेलावणारा व्हिडीओ
दरम्यान, लहान मुलांमध्येदेखील मोठ्या व्यक्तींप्रमाणेच काही लक्षण आढळून येतात. ताप येणं, अंगदुखी, सर्दी अशी अनेक लक्षण पाहायला मिळतात. परंतु, अनेकदा लहान मुलांना त्यांना नेमकं काय होतंय हे सांगता येत नाही. त्यामुळे या काळात पालकांनीच मुलांच्या आरोग्याकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे, असं डॉक्टर पारीख यांनी सांगितलं आहे.
Web Title: Corona Virus Third Wave Corona Symptoms In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..