Maharashtra Teacher Recruitment
esakal
मुंबई : राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांतील शिक्षकांच्या १० हजार ३२८ रिक्त पदांच्या भरतीसाठी पवित्र पोर्टलमार्फत ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य प्रक्रियेसाठी शिफारस करण्यात आली आहे. या उमेदवारांच्या २७ हजार १५४ प्राधान्यक्रमांचा समावेश असलेली नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्य प्रक्रिया ३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.