शिक्षकही आता कंत्राटी! नव्या निर्णयामुळे शासकीय सेवेत असणार १३८ प्रकारचे अधिकारी-कर्मचारी कंत्राटी; आरक्षणापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य

राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये सद्य:स्थितीत पावणेतीन लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. विविध विभागांमधील १३८ प्रकारचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पद्धतीने होणार असून त्यासाठी दहा खासगी कंपन्यांची नेमणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Mantralay
Mantralayesakal

सोलापूर : राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये सद्य:स्थितीत पावणेतीन लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. आता देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ हजार पदांची मेगाभरती सुरु आहे. पण, यापुढील भरती आता कंत्राटीच असणार आहे. विविध विभागांमधील १३८ प्रकारचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पद्धतीने होणार असून त्यासाठी दहा खासगी कंपन्यांची नेमणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षक देखील कंत्राटी असणार आहेत.

राज्य सरकारचे वार्षिक उत्पन्न सध्या साडेतीन लाख कोटींपर्यंत आहे. त्यातील अंदाजे दोन लाख कोटी रुपयांचा खर्च वेतन, निवृत्ती वेतनावरच होतो आहे. त्यामुळे भविष्यात रिक्त पदांची भरती झाल्यानंतर उत्पन्नाच्या अंदाजाने राज्य सरकारकडे विकासकामांसाठी पुरेशा प्रमाणात निधीच उपलब्ध राहणार नाही, अशी चिंता आहे.

या पार्श्वभूमीवर आता १० खासगी कंपन्यांच्या माध्यमातून १३८ प्रकारचे अधिकारी व कर्मचारी कंत्राटी तत्वावरच राज्य सरकारमध्ये घेतले जाणार आहेत. त्यांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता व वेतन देखील निश्चित करण्यात आले आहे. अनुभव, वयोमर्यादा, शिक्षण यातून खासगी कंपन्या परीक्षा घेतील आणि मेरिट यादी प्रसिद्ध करून संबंधित उमेदवार त्या वेतनावर काम करतील, असा ६ सप्टेंबरचा निर्णय आहे. या निर्णयामुळे राज्य शासकीय एका कर्मचाऱ्याच्या वेतनात कंत्राटी तत्वावर घेतलेले तीन ते चार कर्मचारी काम करतील एवढा खर्च बचत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

शिक्षकाची अशी असणार पात्रता, अनुभव अन्‌ वेतन

डीएड, बीएड होऊन टेट, टॅट झालेल्या उमेदवाराकडे अध्यापनाचा तीन वर्षांचा अनुभव असल्यास त्यास दरमहा ३५ हजार रुपयांचे वेतन मिळणार आहे. दुसरीकडे सहशिक्षक पदासाठी दोन वर्षांचा अनुभव जरूरी असून त्या पदावर निवड झाल्यांनतर दरमहा २५ हजार रुपयांचे फिक्स वेतन मिळणार आहे. कदाचित ही शासनाच्या ‘पवित्र’ पोर्टलद्वारे होणारी शेवटची भरती असेल, असेही सांगितले जात आहे. यापुढे शिक्षक रिक्त झाल्यानंतर त्या वेतनावर खासगी कंपन्यांच्या माध्यामातून उमेदवारांची निवड होणार आहे.

नवीन कंत्राटी भरतीतील पदे...

कामगार कर्मचारी प्रकार

  • अतिकुशल ७०

  • कुशल ५०

  • अर्धकुशल ०८

  • अकुशल १०

  • एकूण १३८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com