esakal | अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेत बाधा, CET नोंदणीच्या संकेतस्थळामध्येही तांत्रिक गोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

11th online admission

11th admission : CET नोंदणीच्या संकेतस्थळामध्येही तांत्रिक गोंधळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी (CET for eleventh admission) (एफवायजेसी सीईटी २०२१) मंगळवारपासून सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी नोंदणी करताना विद्यार्थ्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागला. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक टाकल्यानंतर तेथे येणारी गुणपत्रिका आणि मुळ गुणपत्रिकेची जुळवाजुळव होत नसल्याने उघडकीस आले. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळावर (state education board) आता संकेतस्थळातच दुरुस्ती करण्याची वेळ आली. (technical issues in registration of CET for eleventh admission)

हेही वाचा: ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार घेतली जात आहे. परंतु, ती केवळ विद्यार्थ्यांसाठी पर्यायी अर्थात ऐच्छिक परीक्षा असणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला ही परीक्षा द्यायची असेल तर ते विद्यार्थी परीक्षेला बसू शकतील. परीक्षेला बसण्याची कुणावरही सक्ती नाही. सीईटी २१ ऑगस्टला घेतली जाणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी निकालावेळी संकेतस्थळामध्ये प्रचंड तांत्रिक गोंधळ निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांना निकाल बघण्यासाठी अडथळे पार करावे लागले. त्यानंतर निकाल मिळाले. आता इयत्ता अकरावी प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी संकेतस्थळामध्ये अनेक तांत्रिक अडचणीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर आपला बैठक क्रमांकाची नोंद करायची होती. यानंतर त्याची माहिती तेथे येणार असून त्याला परीक्षा द्यायची की नाही असा पर्याय निवडायचा होता. मात्र, संकेतस्थळावर अनेक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असता त्यांची मुळ गुणपत्रिका व संकेतस्थळावर देण्यात येणाऱ्या गुणपत्रिकेमध्ये फरक असल्याचे दिसून आले. तर काही विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचा प्रयत्न केला असता संकेतस्थळामध्ये अनेकदा ‘एरर’ येत असल्याने अर्जच करता आला नाही. त्यामुळे पहिल्याच दिवशी बहुतांश विद्यार्थ्यांना मन:स्ताप सहन करावा लागला.

संकेतस्थळात तांत्रिक बिघाड -

सीईटीच्या संकेतस्थळामध्ये अनेक चुका दिसून आल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर त्यातील तांत्रिक चुका दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली. त्यामुळे संकेतस्थळाची योग्य तपासणी न करता मंडळाने अर्ज नोंदणीला सुरुवात कुठल्या आधारावर केली असा सवाल करण्यात येत आहे.

loading image