
Maharashtra Heat Wave : पुढील पाच दिवस महत्वाचे, अति उष्णतेने राज्य तापणार
राज्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा पारा ४१ अंशांच्या वर असून चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. या ठिकाणी ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मराठवाड्यातही तापमानाने उच्चांक गाठला आहे.
हेही वाचा: राज्यातील 'या' जिल्ह्यांत पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पाऊस
हेही वाचा: Maharashtra Heat Wave: जगात चंद्रपूर सर्वात 'हॉट', तापमानाचा कहर
सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानात काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे घट झाली आहे. मात्र पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यातील तापमानात पुन्हा वाढ होणार असून अती उष्णतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मागील आठवड्यात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापुरात पाऊस झाला. यामुळे वातावरणात काही ठिकाणी गारवा होता. मात्र दिवसाच्या तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्येही पुन्हा पारा वाढला आहे.
Web Title: Temperature Rises Due To Heat Wave In Maharashtra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..