esakal | फडणवीस सरकारचे टेंडर रॅकेट उघड : काँग्रेस
sakal

बोलून बातमी शोधा

फडणवीस सरकारचे टेंडर रॅकेट उघड : काँग्रेस

फडणवीस सरकारच्या काळातील पंतप्रधान घरकुल योजनेतील सिडकोच्या १४ हजार कोटी रुपये आणि आरे कॉलनी येथील मेट्रो भवनच्या टेंडरच्या गैरव्यवहाराबाबत काँग्रेसने केलेली तक्रार कॅगने योग्य ठरवली असून याद्वारे फडणवीस सरकारच्या टेंडर मॅनेजमेंट रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

फडणवीस सरकारचे टेंडर रॅकेट उघड : काँग्रेस

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई  - फडणवीस सरकारच्या काळातील पंतप्रधान घरकुल योजनेतील सिडकोच्या १४ हजार कोटी रुपये आणि आरे कॉलनी येथील मेट्रो भवनच्या टेंडरच्या गैरव्यवहाराबाबत काँग्रेसने केलेली तक्रार कॅगने योग्य ठरवली असून याद्वारे फडणवीस सरकारच्या टेंडर मॅनेजमेंट रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे, असा दावा करत काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, की फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये नियमांना बगल देऊन, नियमांची मोडतोड करून मनमानीप्रमाणे नवीन नियम तयार करून राज्यातील मोठमोठ्या प्रकल्पांच्या निविदा तयार केल्या जात होत्या. मर्जीतल्या कंत्राटदारांनाच काम मिळेल याची सोय केली जाऊन टेंडर मॅनेजमेंट रॅकेट चालवले जात होते. नवी मुंबई येथील घरकुल योजनेच्या १४ हजार कोटींच्या निविदेतील भ्रष्टाचार व मेट्रो भवनच्या कंत्राटाचा या कंत्राटाच्या वाटपाशी अर्थपूर्ण संबंध होता, असे सावंत यांनी स्पष्ट केले.  कॅगने घेतलेले आक्षेप या टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शक आहेत, असे सावंत म्हणाले.