मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी चुकीची वक्तव्ये केल्यास काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यावर त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी दिल्यानंतर महाविकास आघाडीतील या दोन पक्षांत या मुद्द्यावरून पुन्हा तणाव निर्माण झाला.