TET घोटाळा : तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर यांना अटक

TET Exam: अनेक मोठे अधिकारी सहभागी असण्याची शक्यता.
TET Exam
TET ExamTeam eSakal

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी चौकशीला बोलावल होत. आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरी टीईटी परीक्षेची (TET Exam) ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

TET Exam
अनिल देशमुख प्रकरणात अकोल्याच्या पोलीस अधिक्षकांना इडीचं समन्स

पुणे सायबर विभागाच्या कार्यालयामध्ये ही चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात आता अनेक मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेळ्या परीक्षांमध्ये पेपर फोडणारे आणि घोटाळे करणारे रॅकेट समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना काही वेळापूर्वीच सल्लागार अभिषेक सावरीकर याला देखील अटक करण्यात आले आहे.

TET Exam
एकच परीक्षा तरीही वेगळा शुल्क,पाहा व्हिडिओ

दरम्यान, म्हाडाच्या पेपरफूटी प्रकरणात पोलिसांनी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख (रा. खराळवाडी, पिंपरी ), अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंधखेडराजा,जि. बुलढाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) यांना अटक केली होती. त्याननंतर सायबर पोलिसांना संशयीत आरोपी डॉ. प्रितिश देशमुख याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी 2020 मध्ये झालेल्या टीईटी परिक्षेत अपात्र झालेल्या 40 हून अधिक विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे सापडली होती. तसेच डॉ. देशमुखच्या चौकशीमध्ये राज्य परीक्षा परिषदेच्या एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव पुढे आले होते. त्यानंतर संशयाची सुई राज्य परीक्षा परिषदेकडे वळली होती. दरम्यान सायबर पोलिसांनी सुपे यास गुरुवारी सकाळी चौकशीसाठी बोलावले होते. त्यांनंतर दिवसभर व रात्री उशीरापर्यंत त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सुपे यास पोलिसांनी अटक केली, त्यास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. सुपे याने शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन उमेदवारांना पास केल्याचा ठपका ठेवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com