Uddhav Thackeray and Raj Thackeray
esakal
मुंबई : येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधूंनी शिवसेना-मनसेच्या युतीची मोठी घोषणा केली. याआधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं. राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या.