विधानसभा अध्यक्षांच्या अडचणी वाढणार? अनिल परबांनी 'त्या' ५ ठरावांचे दिले दाखले, पक्षांतर्गत निवडणुकीत शिंदे अन् नार्वेकरांची हजेरी

विधानसभा अध्यक्षांच्या निकालविरोधात ठाकरे गटाने जनतेच्या न्यायालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड करण्यात आली. आमदार अनिल परब यांनी निकालावर सखोल भाष्य केले.
Anil Parab
Anil Parab
Updated on

विधानसभा अध्यक्षांच्या निकालविरोधात ठाकरे गटाने जनतेच्या न्यायालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड करण्यात आली. आमदार अनिल परब यांनी निकालावर सखोल भाष्य केले.

अनिल परब म्हणाले, या प्रकरणाची सुनावाणी सुप्रीम कोर्टात सुरु होती. मी तेव्हा वकीलांना मदत करण्याचे काम करत होतो. कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडताना काही मुद्दे मांडले होते. हे मुद्दे पाहून सर्व देशाने ठरवलं होतं की १६ आमदार अपात्र होतील. मात्र सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला. सुभाष देसाई यांनी सुनील प्रभु यांच्याबाबत जी याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने निकाल देताना आपले सर्व मुद्दे अधोरिखित करुन एक फ्रेम तयार करुन दिली होती. निकालाची अमलबजावणी करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. म्हणून निकालाती चौकट बनवण्यात आली. ही चौकट अध्यक्षांकडे पाठवतो. या चौकटीच्या आत राहून अध्यक्षांनी निकाल द्यावा, असे कोर्टाने म्हटले होते.

यामध्ये दोन मुद्दे महत्वाचे होते.  एक आमदारांच्या अपात्रतेचा होता. शेड्यूल १० मध्ये याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मात्र निवडणूक आयोगात जो निकाल आला साधारण त्याच निकालाचे वाचन राहूल नार्वेकर यांनी केले.

दोन्ही गटातील आमदरांना अपात्र न करण्याचा निर्णय राहुल नार्वेकरांनी घेतला. यामध्ये त्यांनी सांगितल आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहलं आणि शिवसेनेच्या घटना मागवून घेतल्या. सुप्रीम कोर्टाने जेव्हा निरीक्षण नोंदवल त्यात एक महत्वाच वाक्य होतं की राजकीय पक्ष ठरवताना तुम्हाला केवळ विधीमंडळ पक्ष ठरवता येणार नाही. याबरोबर मुळ राजकीय पक्ष, त्याची घटना, संघटनात्मक रचाना लक्षात घ्यावी लागते. उतर चाचण्या देखील घेण महत्वाचं आहे. मात्र कोणतेही निकष तपासण्यात आले नाहीत.

Anil Parab
NCP MLA Disqualification Case: तर ठरलं...आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात 31 जानेवारीपर्यंत येणार निकाल? सुनावणी संपली

१९९९ नंतर घटना नसल्याचे राहुल नार्वेकरांनी निवडणूक आयोगाच्या हवाल्याने सांगितले. १९९९ ची घटना शेवटची असल्याचे नार्वेकर म्हणाले. १९९९ मध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख होते. त्यांच्याकडे सर्व अधिकार होते. ते आता नसल्यामुळे विधिमंडळ पक्षाला शिवसेना पक्ष म्हणून मान्य देण्यात आली, असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिली.

यावेळी अनिल परब यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेले पुरावे लाईव्ह दाखवले. तसेच शिवसेने केलेले पाचही ठराव वाचून दाखवले. ठरावाले व्हिडिओ देखील अनिल पबर यांनी दिले. शिवसेनाप्रमुख पद गोठवलं तेव्हाच्या ठरावाच्या बैठकीचा व्हिडिओ देखील दाखवण्यात आला. या व्हिडिओत एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते. २०१८ साली पक्षांतर्गत निवडणुकीचे व्हिडिओ देखील अनिल परब यांनी दाखवले. स्वत: राहुल नार्वेकर उपस्थित होते जेव्हा उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून एकमताने निवडून दिले. (Latest Marathi News)

Anil Parab
Shivsena Maha Press: "कोणीही अपात्र नाही असा निकाल देणं सुप्रीम कोर्टाचा घोर अपमान"; अ‍ॅड. सरोदेंची टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com