NCP MLA Disqualification Case: तर ठरलं...आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात 31 जानेवारीपर्यंत येणार निकाल? सुनावणी संपली

शिवसेना आमदरांच्या अपत्रातेच्या याचिकेवरील निकाल दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या याचिकेवरील सुनावणी संपली आहे.
NCP MLA Disqualification Case
NCP MLA Disqualification Case
Updated on

NCP MLA Disqualification Case

शिवसेना आमदरांच्या अपत्रातेच्या याचिकेवरील निकाल दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या याचिकेवरील सुनावणी संपली आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या प्रकरणात एकूण पाच याचिका आहेत. त्या याचिका दोन गटात विभाजित केल्या जाणार आहेत. दरम्यान 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्यात येणार. दोन्ही गटातील सदस्यांना फेरसाक्ष देण्यासाठी 20 जानेवारी पासून बोलावण्यात येणार आहे.  (Latest Marathi News)

25 जानेवारी पर्यंत दोन्ही गटाच्या बाजू ऐकुन घेतल्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय राखून ठेवणार आहेत.  31 जानेवारी पर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे. 

NCP MLA Disqualification Case
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकार काढणार 'तीन' नवीन अधिसूचना, बच्चू कडूंची विस्तृत माहिती; मनोज जरांगेंना देणार मसुदा

अजित पवार यांनी राष्ट्रवादीविरोधात बंड केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. पक्षात फूट पडल्यानंतर सुरू झालेली लढत आता राष्ट्रवादी कुणाची? इथपर्यंत पोहचली आहे. काका आणि पुतण्या दोघांनीही आपापले दावे केले आहेत. त्यांच्याकडे सर्वाधिक आमदार असल्याचे दोघांचे म्हणणे आहे.

आता पक्षावरील सत्तेची ही विधानसभा अध्यक्षांच्या दारापर्यंत पोहोचली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने प्रतिज्ञापत्रात सुमारे ४० आमदार-खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केल्याची माहिती आहे. पक्षाचे अधिक आमदार आमच्या बाजूने असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे त्यांनी पक्षावर आपला दावा ठोकला आहे.

NCP MLA Disqualification Case
Sharad Mohol: महिन्यापूर्वी बैठक नंतर शरद मोहोळच्या हत्येचा कट, नेमकं काय घडलं? वाघ्या मारणेला २० जानेवारीपर्यत पोलिस कोठडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com