Thackeray vs Shinde: "जे कोर्टाचं देखील काम नाही, ते राज्यपालांनी कसं काय केलं?" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thackeray vs shinde chief justice d y chandrachud read marathi letter  for supreme court

Thackeray vs Shinde: "जे कोर्टाचं देखील काम नाही, ते राज्यपालांनी कसं काय केलं?"

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. मागील सुनावणीवेळी ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला. त्यानंतर आजही ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला आहे. आजपासून पुन्हा सलग तीन दिवस सुनावणी पार पडणार आहे.

आज सुनावणीला तब्बल 15 मिनिटे उशीरा सुरू झाली आणि सुरुवातीलाच सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ठाकरे गटाच्या वकिलांनी वेळेमध्ये सुनावणी पूर्ण करण्याची सूचना दिली. या सूचनेवरून सुप्रीम कोर्टाला दोन्ही बाजूची सुनावणी याच आठवड्यात पूर्ण करणार असल्याचं दिसून येत आहे.

ठाकरे गटाचे वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी आपण ४५ मिनिटांमध्ये युक्तिवाद पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आणि पहिल्याच महत्वाचा मुद्दा मांडला.

"ज्या गोष्टींवरती सुप्रीम कोर्टाला देखील हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असं आपण म्हणत आहे. स्वायत्त संस्था आणि विधानसभेच्या अध्यक्षांना अधिकार असल्याचं आपण म्हणत आहे. तर मग जे कोर्टाचं देखील काम नाही ते राज्यपालांनी कसं काय केलं? शिवसेनेत फूट पडलीय हे राज्यपालांनी कसं काय ठरवलं आणि बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन कसं काय बोलावलं?", असा प्रश्न अभिषेक मनु सिंघवी यांनी 5 सदस्यांच्या खंडपीठासमोर उपस्थित केला आहे.

एखाद्या पक्षात फूट पडली किंवा एकनाथ शिंदे यांचाच खरा पक्ष असल्याचा निकालच जणू राज्यपालांनी आपल्या कृतीतून दिला होता, असं ठाकरे गटाचे वकील मनु सिंघवी यांनी कोर्टात म्हंटलं आहे.

शिंदेंकडचे आमदार हेच शिवसेना असल्याचं मानून त्यांनी सरकारला शपथ कशी काय दिली? तसंच ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे अशा आमदारांना शपथ देऊन भविष्यात संबंधित आमदार पात्र ठरणार आहेत असा निकालच त्यांनी देऊन टाकला का?, असा प्रश्न उपस्थित करत अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे.