Arvind Sawant : ...हे तर तमासगीर; पडळकरांच्या आंदोलनावरुन अरविंद सावंतांची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Savant

Arvind Sawant : ...हे तर तमासगीर; पडळकरांच्या आंदोलनावरुन अरविंद सावंतांची टीका

मुंबईः विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये एसटी कर्मचारी आंदोलन करणार आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकरांवर टीका करतांना खासदार अरविंद सावंत यांनी खालच्या भाषेत टिपण्णी केली आहे.

राज्यातल्या सत्तासंघर्षाबद्दल बोलतांना अरविंद सावंत म्हणाले की, राजकीय पक्ष हा सभागृहाच्या बाहेर असतो. बाहेर राजकीय पक्ष तर आतमध्ये विधीमंडळ पक्ष असतो. ५५-५६ जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. परंतु जे लोक पक्षाचा एबी फॉर्म घेऊन निवडणूक लढले आणि पडले, त्यांचं काय? ते पक्ष नाहीत काय? नगर पालिका, महानगर पालिका, जिल्हा परिषद या संस्थांचे विजयी पराभूत सदस्य पक्ष नसतात का? असे प्रश्न सावंतांनी उपस्थित केले.

ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाचं वागणं घटनाबाह्य आहे. केंद्राकडून घटनाबाह्य वागणाऱ्यांना बक्षिस दिलं जातंय, असं म्हणून त्यांनी पडळकरांवर टीका केली. एसटी महामंडळासाठी महाविकास आघाडी सरकारने चांगले निर्णय घेतले. परंतु हे तमासगीर आहेत, टाळ घेतात..नाचतात. अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

काय म्हणाले अरविंद सावंत?

 • बाहेर राजकीय पक्ष आतमध्ये विधीमंडळ पक्ष असतो

 • ५५-५६ जागा शिवसेनेने जिंकल्या

 • जे पक्षाचे लोक पराभूत झाले ते म्हणजे पक्ष नाहीत का?

 • जे लोक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निववडणुका लढवतात, ते पक्ष नाहीत का?

 • निवडणूक आयोगाचं वागणं घटनाबाह्य आहे

 • हे विकावू लोक आहेत, कुणाला खासदारकी मिळते, कुणाला राज्यपालपद

 • निवडणूक आयोगही त्याच पातळीवर जावून वागत आहे

 • एसटी कर्मचाऱ्यांसाठी उद्धव ठाकरेंनी महिन्याला ३६० कोटींची तरतूद केली होती

 • दिवाकर रावतेंनी कन्या योजना आणल्या. महिलांसाठी चांगले निर्णय घेतले

 • गोपीचंद पडळकर हे तमासगीर आहेत. टाळ घेतात नाचतायत काय?

 • एसटी महामंडळाच्या इतिहासात हजार कोटी रुपये अनिल परब यांनी आणले होते

टॅग्स :Shiv Senaarvind sawant