Shivsena Akola News : भावना गवळी-विनायक राऊत आमनेसामने; समर्थकांकडून पुन्हा 'गद्दार'ची घोषणाबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena Akola News

Shivsena Akola News : भावना गवळी-विनायक राऊत आमनेसामने; समर्थकांकडून पुन्हा 'गद्दार'ची घोषणाबाजी

अकोला रेल्वे स्थानकावर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आमने-सामने आले आहेत. विदर्भ एक्सप्रेसने दोन्ही खासदार मूंबईकडे निघतांना दोघेही अकोला रेल्वे स्थानकावर समोरा-समोर आले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भावना गवळींसमोर 'गद्दार-गद्दार' अशी घोषणाबाजी केली आहे. भावना गवळी डब्याच्या बाहेर आल्यानंतरही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी केली घोषणाबाजीच्या वेळी आमदार नितीन देशमुखही उपस्थित होते. खासदार गवळी बसलेल्या डब्याच्या खिडकीच्या काचावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुक्क्या देखील मारल्या.

दरम्यान, दोन्ही नेते आमनेसामने येताच ठाकरे गटाच्या जमलेल्या कार्यकर्त्यांनी भावना गवळी यांच्या समोर घोषणा द्यायला सुरवात केले. भावना गवळी दिसताच कार्यकर्ते गद्दार गद्दार अशा घोषणा देऊ लागले. यानंतर शिवसेना जिंदाबाद, ठाकरे गट जिंदाबाद अशा स्वरूपाच्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. भावना गवळी रेल्वेमध्ये बसेपर्यंत कार्यकर्त्यांनी मागे जात या घोषणा दिल्या आहेत. यावेळी रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला.

हे ही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे आणि 40 आमदार सरकारमधून बाहेर पडले. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करून भाजपसोबत युती करून राज्यात पुन्हा सरकार स्थापन केलं. हे सरकार पाडून भाजप सोबत जाण्यासाठी 50 खोके मिळाले असल्याचा आरोप ठाकरे गट, राष्ट्रवादी हे पक्ष सातत्याने करत असतात. तर शिवसेनेतून बाहेर पडून न सांगता गुवाहाटीला गेल्यामुळे आणि भाजपसोबत युती केल्यामुळे एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांना गद्दार म्हणून टीका केली जाते.