Maharashtra Politics: गुहागरमध्ये ठाकरे गट देणार राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का!

उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करणार ठाकरे गटात प्रवेश
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal
Updated on

गुहागरमध्ये ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याच्या प्रयत्नात आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खेडच्या सभेमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नावाबद्दल गुप्तता पाळण्यात आली आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडी एकत्रित आहे. तरीसुद्धा राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आता ठाकरे गटामद्धे येणार आहेत.

राज्यात महाविकास आघाडी असताना राष्ट्रवादी आणि ठाकरे गट हे मित्रपक्ष असतानाही कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर आरोप करत काही नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. पण आता उद्धव ठाकरे यांची सभा आहे याच पार्श्वभूमीवर काही कार्यकर्ते राष्ट्रवादीतुन ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

Maharashtra Politics
Mahavikas Aghadi : "मविआने एकजूट दाखवली तर 2024ला राज्यात सत्ता येईल"

मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटातुन गेलेले कार्यकर्ते पुन्हा येत आहेत. तर राष्ट्रवादीमधील काही कार्यकर्तेही ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. पक्षप्रवेश करणारी मोठी नावे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तर या नावाबद्दल ठाकरे गटाने कमालीची गुप्तता बाळगली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणी आत्तापासूनच सुरू झाली आहे.

Maharashtra Politics
Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात अटक केलेला आरोपी ठाकरे गटाचा पदाधिकारी

तर नुकत्याच पार पडलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने आपला उमेदवार देऊन भाजपचा मोठा गड जिंकला असं असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं की 'कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है', विधानसभेला 200 तर लोकसभेला 40 जागा जिंकू असं त्यांनी म्हंटलं आहे.

तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो तर कसब्याचा निकाल लागतो आणि थोड जर इकडं तिकडं झालं तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही ठिकाणच्या मतदारांनी दिलेला धडा असल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. कसब्याचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. 2024 पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने एकत्रितपणे काम केलं तर विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. तसेच लोकसभेला 40 जागा निवडून येतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला असतानाच राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

Maharashtra Politics
दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com