Shivsena: शिवसेनेच्या 'त्या' पदाधिकाऱ्यांसाठी ठाकरे-शिंदे आले धावून

मुख्यमंत्री शिंदे गटाकडून लाखाची रोख मदत; ठाकरे गटाकडून उपचाराची जबाबदारी
uddhav thackeray and eknath shinde
uddhav thackeray and eknath shindeEsakal

शिवसेना एसटी कामगार संघटनेचे माजी विभागीय पदाधिकारी अरुण कामतकर यांच्या आजारावरील उपचारासाठी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे गट) कडून एक लाख रुपयांची रोख मदत सोलापूर महापालिकेतील माजी गटनेते अमोल शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून दिली. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी उपचाराची जबाबदारी स्वीकारली. दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मदतीने अरुण कामतकर भारावले. (Latest Marathi News)

निराळे वस्तीतील अरुण कामतकर हे गेल्या काही काळापासून पायाच्या आजाराने घरातच अडकून पडले आहेत. सर्वप्रथम ‘सकाळ’मध्ये याबाबतचे सविस्तर वृत्तांकन शनिवारी (ता.२७) प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. एसटी कामगार सेनेच्या बांधणीत व शिवसेनेच्या पहिल्या फळीत त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांची शिवसेनेत वेगळी ओळख आहे. आज शिवसेना दोन गटात असली तरी ते जुने पदाधिकारी असल्याने त्यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांशी जवळचा संबंध आहे.(Latest Marathi News)

uddhav thackeray and eknath shinde
Jayant Patil: 'माझी परवानगी घेऊनच 6 महिन्यासाठी शिंदे गटात...',राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांबद्दल पाटलांचे मोठं वक्तव्य

श्री. कामतकर यांच्या संदर्भातील वृत्त वाचून शिवसेना शिंदे गटाचे माजी गटनेते अमोल शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हीडीओ कॉल लावून या प्रकाराची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हेही त्यांच्याशी बोलले. आपण मुंबईला या म्हणजे योग्य उपचार करता येतील असे सांगितले. तसेच सखाराम मस्के यांनी देखील त्यांची भेट घेतली.(Latest Marathi News)

शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी त्यांची भेट घेऊन उपचाराबद्दल चौकशी केली. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. शिवरत्न शेटे यांच्याकडे उपचार सुरु करावेत. त्यासाठी डॉ. शेटे यांना माहिती देऊन मोफत उपचाराची सोय केली जाईल. तसेच उपचारास ने-आण करण्यासाठी निरंजन बोध्दूल हे स्वतः लक्ष घालतील असे सांगितले.(Latest Marathi News)

uddhav thackeray and eknath shinde
Jayant Patil: 'अहिल्यादेवींच नाव देण चांगलचं पण...', अहमदनगरच्या नामांतराबद्दल जयंत पाटलांची भूमिका

अरुण कामतकरांनी देखील त्यासाठी होकार दिला आहे. लवकरच निरंजन बोध्दूल त्यांना घेऊन डॉ. शिवरत्न शेटे यांच्याकडे उपचारासाठी घेऊन जातील. पूर्ण बरे होईपर्यंत निरंजन बोध्दूल त्यासाठी लक्ष घालणार आहेत. ‘सकाळ’ ने या संदर्भात पाठपुरावा केला होता.(Latest Marathi News)

uddhav thackeray and eknath shinde
Prashant Corner Case: श्रीकांत शिंदेंची पत्नी आणि मिठाईच्या दुकानाचा वाद! काय आहे संपूर्ण प्रकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com