महाड : किल्ले रायगडावर धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका ३७ वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सध्या तरुणाचा शोध घेतला जात असून परिसरात घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. .मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील रहिवासी असलेल्या सुयोग पांचाळ (वय ३७) हा काल शनिवारी किल्ले रायगडावर पोहोचला होता. किल्ले रायगडचं टकमक टोकावर पोहोचल्यानंतर तरुणाने त्याच्या घरी फोन करून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणाने त्याचा मोबाइल फोन बंद केला. तरुणाच्या फोनकॉलनंतर त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने किल्ले रायगडाकडे धाव घेतली..दरम्यान, सुयोग याचा भाऊ सुवेल पांचाळ याने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी उभी असलेल्या सुयोगच्या मोटारसायकलची पाहणी केली. मात्र सुयोगचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्यामुळे त्याने घटनेची माहिती तातडीने महाड तालुका पोलिस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस, रेस्क्यू टीम आणि स्थानिकांच्या मदतीने बेपत्ता तरुण सुयोगचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे..सध्या रायगड किल्ले परिसरात पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली असून अद्याप सुयोग पांचाळ याचा ठावठिकाणा लागला नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ही घटना काल संध्याकाळी (शनिवार, ता. ३) रोजी उशिरा समोर आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर तरुणाने नेमके कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलण्याचे सांगितले, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.