
कल्याण जवळ असलेल्या दहागाव या खेडेगावामध्ये राहणारी आजी आयुष्यात कधीही कारमध्ये ड्रायव्हर सीटवरही बसली नसेल. पण, ती आज स्वत: कार चालवते.
89 Year Old Woman Can Drive Car : कधीही कारमध्ये न बसलेली आजी. त्यात आजीचं वय 89 वर्षे. पण, तिच आजी बिनधास्त कार चालवते, यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. जर, तुम्ही ठरवलं तर काहीही साध्य करता येते. याचे एक उदारहणच ठाणे जिल्ह्यात, कल्याण तालुक्यातील दहागाव येथील आजीबाईंनी दाखवून दिलय. आजींना चार वर्षांपूर्वी नातवाने कार चालवण्याचे धडे दिले होते. चार वर्षांनी नातवाने पुन्हा आजीला विचारलं, 'कार चालवणार का?' चार वर्षांपूर्वी शिकवलेलं सगळं लक्षात ठेवून आजीनं कार चालवून दाखवली.
कल्याण जवळ असलेल्या दहागाव या खेडेगावमध्ये राहणारी आजी आयुष्यात कधीही कारमध्ये ड्रायव्हर सीटवरही बसली नसेल. पण, ती आज स्वत: कार चालवते. गंगाबाई केशव मिरकुटे असं या आजीबाईंच नाव. त्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण गावातील दहागाव या छोट्याशा खेड़्यात राहतात. 3-4 वर्षांपूर्वी आजीबाई थोड्याफार आजारी होत्या. त्यांना भेटण्यासाठी आलेला त्यांचा नातू विकास भोईर यांनी आपल्या आजीला कार चालवणार का? असा प्रश्न विचारला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावर त्यांनी मला जमेल का? असा प्रतिप्रश्न करून शिकण्याची इच्छा व्यक्त केली. आजीचा हा अंदाज नातवाला चांगलाच भावला. त्याने आजीला गाडीत बसवून मैदानात नेले. काल कशी चाववावी याचे धडे त्यांनी आपल्या आजीला दिले. क्लच, गिअर, ब्रेक, स्ट्रेअरिंग आणि एक्सलेटर बद्दल माहिती देत त्याने आजीला गाडी चालवायला सांगितले. नातवाच्या मार्गदर्शनानंतर त्यांनी कार चालवली.
Exclusive:पुष्पाताई म्हणजे शेतीतील चालते बोलते विद्यापीठ!;शेती कसण्याची उमेद कायम
त्यानंतर जवळपास 3-4 वर्षानंतर विकास भोईर पुन्हा कार चालवणार का? असा प्रश्न आपल्या आजीला केला. यावेळी आजीबाईंना क्लच, गिअर, ब्रेक, स्ट्रेअरिंग आणि एक्सलेटरबद्दल पहिल्यांदा दिलेली माहिती लक्षात होती. वृद्धापकाळात नवीन गोष्टी शिकणे कठीण असते. स्मरण शक्तीही फार नाही. पण, या आजींनी या गोष्टीला अपवाद असतात. छोट्या-मोठ्या आजारातून बरे होण्यासाठी आजी अशा काही तरी, नवीन गोष्टी करतात. आजींची ही कहाणी प्रत्येकालाच प्रेरणादायी आहे. जगात अशक्य काही नसते गरज असते ती, एखादी गोष्ट समजून घेऊन ती शक्य करून दाखवण्याची इच्छा शक्तीची!