Thane Lok Sabha 2024: राजन विचारेंविरुद्ध शिंदेंचा शिलेदार ठरला? ईडीच्या रडारवर आलेल्या आमदारालाच संधी?

Thane Lok Sabha 2024: ठाणे लोकसभा मतदारसंघातली लढत जवळजवळ निश्चित झाली आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना, ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत होणार असल्याची चर्चा आहे.
Thane Lok Sabha 2024
Thane Lok Sabha 2024esakal

Thane Lok Sabha 2024

ठाणे लोकसभा मतदारसंघ... शिवसेनेचा बालेकिल्ला... पण याच शिवसेनेत आता फूट पडली आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथून येतात तो मतदारसंघ म्हणजे ठाणे... आणि या ठाण्यातून महाविकासआघाडीकडून उद्धव ठाकरेंना ही जागा मिळाली आहे तर, राजन विचारे जे विद्यमान खासदार आहेत, त्यांनाच मविआकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून अजूनही शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा होती. पण, आता ही जागा शिंदेंना मिळणार असल्याचं त्यांचा ठाण्याचा उमेदवारही ठरल्याचं कळतंय. ते उमेदवार म्हणजे प्रताप सरनाईक. आता रविंद्र फाटक नाही, नरेश म्हस्के नाही तर थेट सरनाईकांचं नाव कसं आलं? तेच समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा...

Thane Lok Sabha 2024

ठाणे लोकसभा मतदारसंघातली लढत जवळजवळ निश्चित झाली आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना, ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत होणार असल्याची चर्चा आहे. शिंदेंकडून आता प्रताप सरनाईक यांचं नाव चर्चेत आहे. तर, राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की प्रताप सरनाईक हे स्वयंघोषित उमेदवार आहेत. त्यामुळे आता याआधी चर्चेत नसतानाही प्रताप सरनाईकांच्या नावाची आताच चर्चा का होत आहे? ते म्हणजे- प्रताप सरनाईक यांनी पोलिस आयुक्तांना लिहिलेलं हे पत्र...

या पत्रात प्रताप सरनाईकांनी म्हटलंय की,

लोकसभा निवडणूक २०२४ च्या उमेदवारीकरिता अर्ज दाखल करणार असून, माझ्याविरुद्ध वसई-विरार, मिरा-भाईंदर कार्यक्षेत्रात गुन्हे दाखल आहेत का? त्याबाबत माहिती मिळणे आवश्यक आहे. तरी, आपण माझ्याविरुद्धच्या दाखल गुन्ह्यांची माहिती देण्याची कृपा करावी, ही नम्र विनंती.

त्यामुळे याआधी शिंदे गटाकडून रविंद्र फाटक, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्केचं नाव चर्चेत होतं. पण प्रताप सरनाईकांच्या पोलिसांसोबतच्या या पत्रव्यवहारामुळे ते शिंदेंचे लोकसभेचे शिलेदार असतील, अशी चर्चा आहे. तरी, आता प्रताप सरनाईक यांचा राजकीय प्रवासही समजून घेऊयात-

तर, ठाणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास सांगायचा झाला तर, सुरुवातीला काँग्रेस नेत्यांना संसदेत पाठवणारा हा मतदारसंघ हळूहळू जनता पक्ष आणि भाजपचा बालेकिल्ला झाला. एकेकाळी रामभाऊ म्हाळगींनीही ठाणे लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यानंतर १९९६ पर्यंत ठाण्यावर भाजपचा भगवा फडकायचा. पण १९९६ साली भाजपच्या ताब्यात असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेनं काबीज केला.

यावेळी आनंद दिघेंनी योग्य डाव साधला अन् जागावाटपाच्या चर्चेसाठी आलेल्या प्रमोद महाजनांची बोलती बंद झाली. त्यावेळी ठाणे शिवसेनेकडे आला तो २००९ सालचा एकवेळ अपवाद वगळता आजपर्यंत ठाण्यावर कायम शिवसेनेचाच भगवा फडकलाय. पण यंदा ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यातच होणार आहे. कारण शिवसेनेत पडलेली फूट. ठाकरेंनी विद्यमान खासदार राजन विचारेंना पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर शिंदेंक़डून प्रताप सरनाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. आता प्रताप सरनाईकांचा राजकीय प्रवासही समजून घेऊयात-

प्रताप सरनाईकांचा राजकीय प्रवास-

१९९७ साली राजकारणात प्रवेश
१९९७ साली राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा नगरसेवक झाले
त्यानंतर सलग दोनवेळा ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले
२००८ साली राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत पक्षप्रवेश केला
२००९ साली ठाण्यातील ओवळा-माजिवडा मतदारसंघातून आमदार झाले.

पुढे याच मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ साली म्हणजे सलग तीनवेळा ते विधानसभेत निवडून आले

खरंतर मध्यंतरीच्या काळात म्हणजे महाविकासआघाडीचं सरकार जेव्हा सत्तेत होतं अन् शिवसेनेत फूट पडली नव्हती त्यावेळी ईडीनं केलेल्या कारवायांमध्ये हे प्रताप सरनाईकही होते. त्यांची कोट्यवधीची संपत्तीसुद्धा ईडीनं जप्त केली होती. त्यानंतर ईडीच्या कारवाईला वैतागलेल्या प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंनाही पत्र लिहिलं होतं. त्यावेळी तपास यंत्रणांच्या कारवाईला वैतागून सरनाईकांनी पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याविषयी ठाकरेंना पत्रातून लिहिल्याची चर्चा झाली. तरी, प्रताप सरनाईक ज्या ठाण्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे, तिथल्या विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षीय बलाबल कसं आहे, तेही समजून घेऊयात-

Thane Lok Sabha 2024
Nashik News : धोक्याचा भोंगा वाजला अन...अग्निशमन दलाचे मॉक ड्रिल असल्याचे लक्षात येताच जीव पडला भांड्यात!

२०१९ नुसार विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षीय बलाबल-

मीरा-भाईंदर गीता जैन (भाजप)
कोपरी-पाचपाखाडी एकनाथ शिंदे (शिवसेना)
ओवळा-माजिवडा प्रताप सरनाईक (शिवसेना)
ठाणे         संजय केळकर (भाजप)
ऐरोली गणेश नाईक (भाजप)
बेलापूर मंदा म्हात्रे (भाजप)

खरंतर ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात सध्या सध्या ठाकरे गटाचं वर्चस्व आहे. कारण राजन विचारे इथून विद्यमान खासदार आहेत. आणि महाविकासआघाडीनं अन् ठाकरेंनी पुन्हा त्यांना संधी दिली आहे. तर, एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर राजन विचारेंनी मात्र ठाकरेंची साथ सोडली नाही. आणि एकनाथ शिंदेंप्रमाणेच राजन विचारेंचेही गुरु आनंद दिघेच आहेत. म्हणजे आनंद दिघे यांचे राजन विचारे एक हात होते तर एकनाथ शिंदे दुसरा हात. त्यामुळे विचारेंचंही ठाण्यात चांगलं नाव अन् वर्चस्व आहे.

तर, शिंदेंबाबत सांगायचं झालं तर सुरुवातीला शिंदेंना कल्याणच्या बदल्यात ठाणे मिळेल अशी चर्चा होती. पण आता कल्याण आणि ठाणे दोन्ही जागा महायुतीत शिंदेंना मिळणार असल्याचं निश्चित झाल्याचं कळतंय. अशातच ठाण्यात शिंदेंकडून तिघांची नावं चर्चेत होती-१. नरेश म्हस्के  २. रविंद्र फाटक आणि ३. प्रताप सरनाईक. तरी, प्रताप सरनाईकांना अजूनही अधिकृत लोकसभा उमेदवारी घोषित झालेली नाही. त्यामुळे शिंदे सरनाईकांना उमेदवारी देतील की म्हस्के वा फाटक यांच्यापैकी एकाचा विचार करतील, आपली मतं कमेंट करुन कळवा.

Thane Lok Sabha 2024
Lok Sabha Election 2024 : जनमत सर्वेक्षण, ‘एक्झिट पोल’वर बंदीच; निवडणूक आयोगाच्या निर्देशांचं सर्रास होतंय उल्लंघन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com