

ठाणे येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका १७ वर्षांच्या दिव्यांग मुलीची तिच्याच आईने हत्या केली. मृत मुलीची आजी आणि दुसऱ्या एका अनोळखी महिलेच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. नौपाड्यातील गावदेवी परिसरात हे प्रकरण उघड झाले आणि मृतदेहाची विल्हेवाट लावतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.