गडचिरोलीत पोलिसांनी केलेली कारवाई ऐतिहासिक - गृहमंत्री वळसे पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Walse Patil

गडचिरोलीत पोलिसांनी केलेली कारवाई ऐतिहासिक - गृहमंत्री वळसे पाटील

गडचिरोलीच्या ग्याराबत्तीमध्ये झालेल्या हिंसाचारात आज २६ नक्षली मारले गेले. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या कारवाईमध्ये पोलिसांना मोठं यश आलं असून, नक्षलींच्या मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या कारवाईबद्दल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. "आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे," अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आलं असं म्हणत दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे.

loading image
go to top