..तेव्हा महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा दैदिप्यमान विजय झालाय; जयंत पाटलांनी सांगितलं 'मुश्रीफ' कनेक्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil

'प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मी आणि मुश्रीफसाहेब पाहुणे असतो.'

..तेव्हा महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा दैदिप्यमान विजय झालाय : जयंत पाटील

कोल्हापूर : प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मी आणि मुश्रीफसाहेब (Hasan Mushrif) पाहुणे असतो. मुश्रीफांच्या मतदारसंघात (कागल) माझी शेवटची सभा देखील असते आणि जेव्हा-जेव्हा ही सभा कागलला झालेली आहे, तेव्हा-तेव्हा महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा दैदिप्यमान विजय झालाय, असं स्पष्ट मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केलंय. ते राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते.

जयंत पाटील पुढं म्हणाले, कालची राष्ट्रवादीची सभाही कागलमध्येच झालीय. हा योगा योग आहे की, आपल्या सर्वांचं नशीब, हे माहीत नाही. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष राष्ट्रवादी होईल याच्यात आता माझ्या मनात कोणतीही शंका नाहीय. कारण, कागलच्या भूमीचा आशीर्वाद घेऊन आमच्या कार्याचा समारोप केलाय, असं मतही त्यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, केंद्रात भाजपची सत्ता आहे. मात्र, दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तुम्हाला दिल्ली सांभाळता आली नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलीय. तपोवन मैदानातील सभेला राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे.

हेही वाचा: भाजपनं कुठं नेऊन ठेवलीय राजकारणाची पातळी? रुपाली पाटील संतापल्या

Web Title: The Biggest Party In Maharashtra Will Be Ncp Jayant Patil Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top