दिलासादायक घट! राज्यात दिवसभरात 34 हजार रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

राज्यात काल दिवसभरात 34 हजार रुग्ण

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात आज तब्बल 34 हजार 424 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 18 हजार 967 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे, ही दिलासादायक बाब आहे.

हेही वाचा: कोरोना उपचारात Molnupiravir चा वापर नाही; ICMR ने सांगितले कारण

राज्यात 34 ओमायक्रॉनबाधितांची नोंद

राज्यात आज 34 ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालीये. आतापर्यंत 1281 ओमिक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 499 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात ओमिक्रॉन ७८२ रुग्ण आहेत.

दुसरीकडे महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये जानेवारीत ‘कोविड१९’ पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांहून अधिक झाला असल्याचे निरीक्षण केंद्र सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. औरंगाबाद, अकोला, नांदेड आणि वर्धा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.

देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून जात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिस्थितीचा आढावा दहा जानेवारीला सादर केला. या आढाव्यानुसार, २६ डिसेंबर ते एक जानेवारी या आठवड्याच्या तुलनेत दोन जानेवारी ते आठ जानेवारी या काळात चारही जिल्ह्यांमध्ये ‘कोविड१९’ चा पॉझिटिव्हिटी दर वाढला आहे. औरंगाबादमध्ये १२.४५ पट, अकोल्यात १३.३८ पट, नांदेडमध्ये ११.७६ पट आणि वर्ध्यामध्ये १३.७५ पट कोविड१९चा पॉझिटिव्हिटी दर वाढला. चाचण्यांच्या तुलनेत किती रूग्ण कोविड१९ बाधित होतात, यावरून रुग्णांचा पॉझिटिव्हिटीचा दर ठरविला जातो.

हेही वाचा: बारा आमदारांच्या निलंबनावरुन सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या सहा जिल्ह्यांमध्ये आठवड्याच्या रुग्णसंख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला असल्याचे मंत्रालयाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. या सहाही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यात चाचण्यांची संख्या दीडपटीने वाढली आहे. मुंबईमध्ये दोन ते आठ जानेवारीअखेर साडे तीन लाख, तर पुण्यामध्ये सुमारे दीड लाख चाचण्या झाल्या.

देशामध्ये शंभर जिल्ह्यांमध्ये आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्क्यांदरम्यान आहे. त्यामध्ये केरळात सर्वाधिक बारा जिल्हे आहेत. त्याखालोखाल झारखंडमध्ये नऊ आणि महाराष्ट्र, पंजाब, तमिळनाडूत प्रत्येकी आठ जिल्हे आहेत. दहा टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर असलेले ९१ जिल्हे देशात आहेत. त्यातील सर्वाधिक पंधरा जिल्हे पश्चिम बंगालमध्ये आणि महाराष्ट्र, मिझोराममध्ये प्रत्येकी नऊ जिल्हे आहेत.

Web Title: The Decline In Corona Patients Numbers 34 Thousand Patients In A Day In The State

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top