esakal | सिंगापूर, मलेशियात भारतीय कांद्याचा बोलबाला
sakal

बोलून बातमी शोधा

options

सिंगापूर, मलेशियात भारतीय कांद्याचा बोलबाला

sakal_logo
By
महेंद्र महाजन :सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पाकिस्तानमधील बलुचिस्तानमधील कांदा जुना झाला असताना भाव टनाला ४०० डॉलरपर्यंत असल्याने सद्य:स्थितीत सिंगापूर आणि मलेशियामध्ये भारतात साठवलेल्या उन्हाळ कांद्याचा बोलबाला आहे. सिंगापूर आणि मलेशियामध्ये उन्हाळ कांद्याचा टनाचा भाव ३६० ते ३७५ डॉलरपर्यंत आहे. पण त्याचवेळी युरोपसह श्रीलंकेची बाजारपेठ बंद झाली असली, तरीही अफगाणमधील अस्थिरतेमुळे तेथून दिल्लीच्या बाजारात येणाऱ्या कांद्याची आवक थांबल्यात जमा आहे.

हेही वाचा: अनिल देशमुख प्रकरण: CBI अधिकाऱ्याला 'आयफोन'ची लाच

नाशिकच्या साठवलेल्या उन्हाळ कांद्याची आंध्रप्रदेश-तेलंगणा, कर्नाटक या दक्षिण भारतातील कांद्याची स्पर्धा असते. गेल्या दोन वर्षांमध्ये पावसाने दक्षिणेतील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने नाशिकच्या उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळाला. कांद्याची निर्यात बंद केल्याने देशातंर्गत विक्रीसाठी नाशिकच्या कांद्याला ‘लॉटरी‘ लागली होती. मात्र ही परिस्थिती यंदा दिसत नाहीत. दक्षिणेतील नवीन कांदा बाजारात येऊ लागला असला, तरीही त्याच्या गुणवत्तेचा प्रश्‍न असल्याने व्यापाऱ्यांचा सध्या नाशिकच्या कांद्याकडे ओढा आहे. मात्र यंदा पंधरा दिवसानंतर दक्षिणेतील कांद्याची आवक वाढल्यानंतर भाव कसे राहणार याबद्दल प्रश्‍नचिन्ह आहे.

हेही वाचा: तर..रोहिणी खडसेंच्या नावावर सहमती!

कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ हंगामात १ लाख ७१ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती.

कांद्याच्या भावाची स्थिती

(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

  • बेंगळुरु- स्थानिक १ हजार-महाराष्ट्रातील १ हजार १००

  • लखनऊ- २ हजार

  • अजमेर- १ हजार ९००

  • मुंबई - १ हजार ३००

  • पुणे- १ हजार १००

  • येवला- १ हजार ३५०

  • नाशिक- १ हजार २००

loading image
go to top