esakal | तर..रोहिणी खडसेंच्या नावावर सहमती!
sakal

बोलून बातमी शोधा

Rohini Khadse-Eknath Khadse

राजू शेट्टींचे नाव वगळल्याचे सांगितले जात असून दुसरे कोणते नाव असेल याबाबत उत्सुकता आहे. तर एकनाथ खडसेंच्या नावाला भाजपचा तीव्र आक्षेप असल्याने त्या नावाबाबतही राष्ट्रवादी माघार घेण्याची शक्यता आहे.

तर..रोहिणी खडसेंच्या नावावर सहमती!

sakal_logo
By
सचिन जोशी


जळगाव : राज्यपालांनी (Governor) नामनिर्देशित करावयाच्या बारा आमदारांच्या यादीत (MLAs List) राजू शेट्टींचे (Raju Shetty) नाव बदलण्यात आले असून माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) नावावरही आक्षेप घेतला जाण्याची शक्यता लक्षात घेता, खडसेंऐवजी त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर (Adv. Rohini Khadse-Khewalkar) यांच्या नावावर सहमती होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: अंजनी प्रकल्पातील जलसाठा ४४ टक्क्यांवर


विधान परिषदेवर राज्यपालांनी नामनिर्देशित करावयाच्या १२ जागा रिक्त असून राज्य मंत्रिमंडळाने गेल्या वर्षीच नोव्हेंबरमध्ये या १२ आमदारांच्या नावांची यादी शिफारसीसह राज्यपालांकडे पाठवली आहे. दहा महिन्यांनंतरही राज्यपालांनी या यादीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, अथवा ही यादी फेटाळलीही नाही.


सरकारचे प्रयत्न
आमदारांच्या या रखडलेल्या नियुक्तीचा मुद्दा उच्च न्यायालयापर्यंत गेला. परंतु, न्यायालयालाही राज्यपालांच्या अधिकाराबाबत हस्तक्षेप करता येत नसल्याने यावरील सुनावणी पूर्ण होऊनही त्यातून निष्पन्न झाले नाही. अखेरीस सरकारकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्यपालांना नुकतेच जाऊन भेटले व या विषयाला चालना मिळाली.

हेही वाचा: प्रेमविवाहानंतर आठवला व्यवहार; पतीसह सहा जणांवर गुन्हा


शेट्टींचे नाव वगळले
या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसने राजू शेट्टींचे नाव वगळल्याचे सांगितले जाते. त्या बदल्यात दुसरे कोणते नाव दिले, याबाबत उत्सुकता आहे. तर एकनाथ खडसेंच्या नावाला भाजपचा तीव्र आक्षेप असल्याने त्या नावाबाबतही राष्ट्रवादी माघार घेण्याची शक्यता आहे. मात्र, खडसेंचे नाव अद्याप राष्ट्रवादीने वगळलेले नाही. त्यांच्या नावाला आक्षेप घेतला गेला तर त्यांच्या कन्या व जिल्हा बँकेच्या चेअरमन ॲड. रोहिणी खडसेंचे नाव पुढे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा: हतनूर धरणातून ७६ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग; सतर्कतेचा इशारा


खडसेंच्या नावावरील संभाव्य आक्षेप
गुरुवारी खडसेंचा वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या वाढदिवशीच राज्यपालांकडून या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता होती. मात्र, तसे होऊ शकले नाही. राजू शेट्टींचे नाव वगळल्याचे वृत्त याच दिवशी समोर आले. त्यामुळे खडसेंच्या नावावरील संभाव्य आक्षेप लक्षात घेता रोहिणी खडसेंचे नाव चर्चेत आले आहे.

loading image
go to top