शेतकऱ्यांनो, नाव नोंदवा अन्‌ दरवर्षी मिळवा 6000 रुपये! | Agricultural News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांनो, नाव नोंदवा अन्‌ दरवर्षी मिळवा 6000 रुपये!
शेतकऱ्यांनो, नाव नोंदवा अन्‌ दरवर्षी मिळवा 6000 रुपये!

शेतकऱ्यांनो, नाव नोंदवा अन्‌ दरवर्षी मिळवा 6000 रुपये!

सोलापूर : दोन हेक्‍टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीतून (Pradhanmantri Shetkari Sanman Nidhi) केंद्र सरकारकडून (Central Government) वार्षिक सहा हजारांची मदत दिली जाते. त्यासाठी नवीन शेतकऱ्यांची 'पीएम-किसान'वर नोंदणी आता सुरू झाली असून ज्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रातून नाव नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाचे उपसचिव जयंत टेकाळे (Jayant Tekale) यांनी केले आहे.

हेही वाचा: एसटी वाहतूक सुरू होणार! परिवहनमंत्री घेणार 'हा' निर्णय

केंद्र सरकारने 1 डिसेंबर 2018 पासून देशातील शेतकऱ्यांना प्रत्येक तीन महिन्याला दोन हजार रुपये देणारी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. राज्यातील एक कोटी 14 लाख शेतकऱ्यांनी त्यासाठी नोंदणी केली असून त्यातील एक कोटी सहा लाख शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये मिळतात. ही रक्‍कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होते. दुसरीकडे, इन्कम टॅक्‍स भरणारे, शासकीय नोकरदार असलेल्या आणि शासनाने ठरवून दिलेल्या निकषांत न बसणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांना थोडीशी आर्थिक मदत होईल, या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे. आता या रकमेत वाढ केली जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सहा हजारांवरून दहा हजारांपर्यंत रक्‍कम वाढविण्याचा निर्णय होऊ शकतो, अशीही चर्चा आहे. केंद्र शासनाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करूनही योजनेचा लाभ न मिळणाऱ्यांना नाव नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाव नोंदणी केलेल्यांना दर तीन महिन्याला दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आहेत.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन शेतकऱ्यांना नाव नोंदणी करता येणार आहे. ज्यांना आतापर्यंत लाभ मिळालेला नाही, त्यांना नोंदणीनंतर लाभ मिळणार आहे.

- जयंत टेकाळे, उपसचिव, शेतकरी सन्मान निधी योजना, पुणे

हेही वाचा: कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक! जाणून घ्या मुदत

नाव नोंदणीसाठी 'सात-बारा' बंधनकारक

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याचा दोन हेक्‍टरपर्यंत जमीन असल्याबद्दलचा 'सात-बारा' लागणार आहे. तसेच आधार कार्ड, रेशनकार्ड, आठ अ आणि बॅंक पासबुक लागणार आहे. जवळील आपले सरकार सेवा केंद्रातूनही नाव नोंदणी करता येणार आहे.

loading image
go to top